शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

‘डीपीसी’त ९९.३२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 10:41 PM

जिल्हा नियोजन समिती निवडणूक २०१७ साठी रविवार १० सप्टेंबर रोजी मतदान पार पडले. जिल्ह्यात एकूण ९९.३२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक : ४३८ पैकी ४३५ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा नियोजन समिती निवडणूक २०१७ साठी रविवार १० सप्टेंबर रोजी मतदान पार पडले. जिल्ह्यात एकूण ९९.३२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान झाले. या निवडणुकीसाठी ९ मतदान केंद्रांची व्यवस्था होती. यात जि.प.मतदार संघासाठी जिल्हा नियोजन भवनात मतदान घेण्यात आले. महापालिका मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय अमरावती येथे तर दर्यापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अंजनगाव सुर्जी, दर्यापूर नगरपरीषद सदस्यांसाठी, तर अचलपूर उपविभागीय कार्यालयात चांदूर बाजार, अचलपूर, चिखलदरा, नगरपरीषद व धारणी नगरपंचायतीसाठी मतदान केंद्र होते. चांदूर रेल्वे येथे धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नगरपरीक्षद व नांदगाव खंडेश्र्वर नगरपंचायतीसाठी तर मोर्शी येथे, मोर्शी, वरूड, शेंदूजनाघाट, नगरपरीषदांसाठी मतदान केंदाची व्यवस्था होती. या निवडणूकीकरिता महिला व पुरूष असे एकूण ४३८ मतदार होते. जिल्हा परिषदेच्या ४ अविरोध जागांचा अपवाद वगळता उर्ववित १६ जागासाठी २२ उमेदवार रिंगणात होते. यासाठी ५९ झेडपी सदस्यांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. यात २९ पुरूष व ३० महिला मतदारांचा समावेश आहे. झेडपीसाठी दुपारी २ वाजेपर्यत १०० टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. तर महापालिका मतदार संघात १ अविरोध जागेचा अपवाद सोडला तर उर्वरित ६ जागेकरीता १२ जण रिंगणात होते. यात ४० पुरूष व ४७ महिला मतदार आहेत.सर्व ८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. या मतदानाची १०० टक्के आहे. तर नगरपरीषदेच्या ४ पैकी १ जागेचा अपवाद वगळता याठिकाणी ३ जागेसाठी ८ जण रिंगणात होते. यात ११० पुरूष व ११४ महिला मतदार आहेत. यापैकी २२२ पुरूष व महिला मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ९९.११ आहे. आणि नगरपंचायतींच्या १ जागेकरीता ३ उमेदवार रिंगणात होते. या मतदार संघात ३२ पुरूष आणि ३६ महिला मतदार आहेत. यापैकी ६७ पुरूष महिलांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. या मतदानाची टक्केवारी ९८.५३ ऐवढी आहे. एकूणच जिल्हा नियोजन समितीच्या २६ जागेसाठी ९९.३२ टक्के मतदान झाले आहे. यासाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.या सर्व उमेदवारांचे भाग्य रविवारी मतपेटी बंद झाले आहे. या निवडणूकीत ४३८ र्पैकी नगरपंचायतीचे १ व नगरपरीषदेच्या दोन अशा तिघांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नसल्याचे निवडणूक विभागाने दिलेल्या आकडेवारी वरून दिसून येते. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनात अपर जिल्हाधिकारी के.आर परदेशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. याकिरता उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दीभट्टी, गजेंद्र बावणे तसेच अमरावती, चांदूररेल्वे, दर्यापूर, अचलपूर, मोशी आदी ठिकाणचे उपविभागीय अधिकारी यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.८७ नगरसेवकांकडून मतदानमहापालिकेच्या ८७ नगरसेवकांनी जिल्हा डीपीसीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. मनपा क्षेत्रातील ७ पैकी एका जागेवर राधा कुरील या अविरोध निवडून आल्यात. तेथे ६ जागांसाठी मतदान पार पडले.अभ्यंकर यांचा ऐनवेळी पाठिंबाजिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर हे अनुसूचित जाती मतदारसंघातून रिंगणात होते. मात्र, त्यांनी ऐनवेळी पक्षाच्या हिताचे दृष्टीने आपली उमेदवारी मागे घेतली. त्यांनी आपले उमेदवारीचे समर्थन भाजपाचे याच मतदार संघातील उमेदवार अनिल डबरासे यांना घोषित केले.त्यांच्या प्रताप अभ्यंकर यांच्या या निर्णयामुळे या मतदार संघातील उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला.काँग्रेसचा १२ जागांवर दावाजिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद मतदारसंघातून सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे १२ सदस्य निवडून येतील, असा दावा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख व आ.वीरेंद्र जगताप, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी केला आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक २९ सदस्य तसेच सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे तीन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक असे एकूण ३३ सदस्य काँग्रेसकडे असल्याने हा विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे झेडपी मतदरसंघातून ९ जागांवर भाजपक्ष विजयी होईल, असा दावा झेडपीचे विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, प्रवीण तायडे व सहकारी पक्षाच्या नेत्यांंनी केला आहे.मंगळवारी फै सलाजिल्हा नियोजन समितीच्या ३२ पैकी ६ जागा अविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे १० सप्टेंबर रोजी उर्वरित २६ जागांसाठी मतदान घेण्यात आले. याकरिता ४५ उमेदवार चारही मतदारसंघातून रिंगणात होते. या सर्व उमेदवारांच्या भाग्याचा फै सला १२ सप्टेंबर रोजी बचत भवन येथे होणाºया मतमोजणीतून होईल.