शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

नवरा नपुंसक; म्हणाला वाच्यता केल्यास बहिणीचे लग्न मोडेल, विवाहितेला घराबाहेर हाकलले

By प्रदीप भाकरे | Published: April 28, 2023 2:15 PM

मानसिक, शारीरिक छळ

अमरावती : ‘मी नपुंसक आहे, मात्र त्याबाबत कुणालाही सांगू नकोस, चुकुनही वाच्यता केलीस, तर तुझ्या बहिणीचे लग्न होऊ देणार नाही, अशी गर्भित धमकी एका विवाहितेला देण्यात आली. पुढे जाऊन तिला अंगावरील कपड्यावर घराबाहेर हाकलून देण्यात आले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी २७ एप्रिल रोजी पिडिताच्या नपुंसक पतीसह तिच्या सासरकडील अन्य तिघांविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी हे सुफियाननगर नंबर २ येथील रहिवासी आहेत.

तक्रारीनुसार, ६ जून २०२१ रोजी पिडिताचे शाकीर (२७) नामक तरूणाशी लग्न झाले. लग्नानंतर लगेचच साकी हा नपुंसक असल्याचे पिडिताच्या लक्षात आले. तिने ती बाब भासरा, सासू व सासऱ्याला सांगितली. मात्र त्याबाबत कुणालाही काहीही सांगू नकोस, डॉक्टरांच्या उपचाराने तो बरा होईल, अशा शब्दात तिची बोळवण करण्यात आली. दरम्यान आठवडयानंतर ती माहेरी आली. पतीच्या नपुंसकतेबाबत त्यांना देखील सांगितले. मात्र त्यांनी मुलीचा संसार सुखात राहावा यासाठी तिला पुन्हा सासरी पाठवले. तिच्या आईवडिलांनी जावई शाकीर याला समजावले. मात्र त्याने तिला अश्लिल शिविगाळ केली. त्याचे कुटुंबिय सुनेसह तिच्या आई वडिलांना मारण्यासाठी प्रोत्साहन देत होते.तो तिला टाळू लागला

सासरी परतल्यानंतर पिडिताने नवऱ्याकडे शारीरीक सुखाची मागणी केली. त्यावेळी त्याने त्यास नकार दिला. याबाबत कुणाला बोललीस तर तुझ्या बहिणीचे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तो त्याच्या खोलीत न झोपता दुसऱ्याच खोलीत झोपू लागला. तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.दागिणे हिसकावले

१९ मे २०२२ रोजी आरोपी शाकीर याने तिला बेदम मारहाण केली. तिला अंगावरच्या कपड्यावर घरातून हाकलून दिले. तसेच तिच्या अंगावरील दागिणे हिसकावून घेतले. ही बाब तिने माहेरी कळविली. त्यामुळे ते तिला घेऊन माहेरी परतले. मात्र त्यानंतरही आरोपीने तिचा पिच्छा सोडला नाही. त्यामुळे अखेर २७ एप्रिल रोजी सायंकाळी तिने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस