शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

सडकसख्याहरीच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 9:13 PM

Amravati News सडकसख्याहरीच्या जाचाला कंटाळून १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना तळेगाव दशासर ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली.

अमरावती : सडकसख्याहरीच्या जाचाला कंटाळून १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना तळेगाव दशासर ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.१५ ते ५.३० च्या सुमारास तिने घरातच मृत्यूला कवटाळले. याप्रकरणी तिच्या पित्याच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी तौफिक शेख हाफीज शेख (२३, रा. तळेगाव दशासर) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

पित्याच्या तक्रारीनुसार, आरोपी हा युवतीला महिनाभरापासून त्रास देत होता. तिचा पाठलाग करीत होता. ही बाब तिने तिच्या चुलतभावाला सांगितली असता, त्यांनी आरोपीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. १७ जानेवारी रोजी ती कुटुंबातील सदस्यांसह तालुक्यातील एका यात्रेत गेली. तेथे तो तिच्या मागे फिरत होता आणि हाताने इशारे करीत होता. त्यावरून तिच्या चुलतभावाने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर ते सर्व जण घरी परतले. मात्र, यात्रेदरम्यान घडलेल्या त्या घटनेमुळे ती अत्यंत खजील झाली. अशातच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी १८ जानेवारी रोजी दुपारी तौफिकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव दशासरचे ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मिश्रा, पोलिस अंमलदार गजेंद्र ठाकरे, मनीष आंधळे, मनीष कांबळे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूMolestationविनयभंग