लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाद्वारा नियमित शेतकरी खातेदारांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात आले. यामध्ये ७७९ शेतकऱ्यांचे अनुदान काही कारणांनी रखडले होते. या खातेदारांना आता व्हीके नंबर प्राप्त होत आहेत. त्यांनी बँक खाते आधार लिकिंग केल्यानंतर त्यांना शासन अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमक्ती योजनेंतर्गत १,३३,९७४ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यापैकी १,२३,१५६ खात्यांना कर्जमाफीसाठी विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेला आहे. यामध्ये १,२०,९०३ खात्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे. त्यापैकी १,१९,१८१ शेतकऱ्यांना ८५७.१९ कोटींचा लाभ देण्यात आलेला आहे.
कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी परंतु नियमित कर्ज भरणाऱ्यांना योजनेत डावलल्यामुळे शेतकरी नाराज झाले होते. अशा शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा शासनाद्वारा करण्यात आली व तीनपैकी दोन वर्ष मुदतीत कर्ज भरणा करणाऱ्या १७,८४२ नियमित शेतकऱ्यांना आतापर्यंत ८१.२५ कोर्टीचा लाभ देण्यात आलेला आहे. यामध्ये ७७९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिले होते.
बँक खात्याचे लिंकिंग ७ सप्टेंबर डेडलाइनमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित खातेदारांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जातो. या लाभासाठी पात्र ठरलेल्या; परंतु आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपूर्वी ही प्रक्रिया करावी. या कालावधीत व्ही. के. नंबरप्राप्त शेतकऱ्यांनी सेतू केंद्रांवर जाऊन बँक खात्याचे आधार लिंकिंग करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी केले आहे.
प्रोत्साहन अनुदानाची जिल्हास्थितीपोर्टलवर अपलोड खाते - ३२,६३१ योजनेत अपात्र खातेदार - ८,१५६ विशिष्ट क्रमांक प्राप्त - १८,९१८ आधार, ई-केवायसी पेंडिंग - ७७९ लाभ मिळालेली खाती - १७,८४२ मिळालेला लाभ (कोटी) - ८१.२५