शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मेळघाटच्या पिली गावात सात मतदारांसाठी आठ कर्मचाऱ्यांचे पथक

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 26, 2024 11:35 AM

Melghat : मारिता केंद्रावर मोबाइल आणि वॉकीटॉकीचीही रेंज नाही

अमरावती : गेळघाटच्या पिली मतदान केंद्रांवर सात मतदार आहेत. विशेष म्हणजे, मतदान पथकात आठ कर्मचारी आहेत. अशीच स्थिती पस्तलाई गावात आहे. येथे १३ मतदार आहेत. मारिता या केंद्रांवर मोबाइलची रेंज तर दूर, वॉकीटॉकीचीही रेंज नसल्याने रनरचा वापर निवडणूक विभाग करत आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान महत्त्वाचे आहे. यासाठी आयोगाचा व पर्यायाने निवडणूक यंत्रणेचा आटापिटा असतो. आयोगाच्या विशेष परवानगीने मेळघाट मतदारसंघातील १३६ केंद्रांमध्ये मतदानाच्या दोन दिवस आधीच मतदान पथक या केंद्रांवर पोहोचले आहे.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर विकासाची पहाट उजाडेल, या आशेने आदिवासी बांधव मतदान करत असल्याचे पाडांमधील वास्तव आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात या गावांचे पुनर्वसन झाले. परंतु, तीन कुटुंबांनी पुनर्वसनाला नकार दिल्याने ते अद्याप या गावातच वास्तव्याला आहेत,

मेळघाटातील अतिदुर्गम भागात बुधवारी २३६ केंद्रांचर तर उर्वरित केंद्रांवर गुरुवारी पथके रवाना करण्यात आली. सर्वांत कमी सात मतदार पिली केंद्रावर व १३ मतदार पस्तलाई केंद्रावर आहेत. येथे मतदान पथक दोन दिवसांपूर्वी रवाना करण्यात आले.- रिचर्ड यांथन, सहायक जिल्हाधिकारी तथा एआरओ. मेळघाट

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही २१ गावांमध्ये अंधार

मेळघाटात २१ गावे अजूनही अंधारात आहेत. ४० गावांत रस्ता नाहीं तर २० पेक्षा अधिक गायांमध्ये अजूनही मोबाइल पोहोचलेला नाही. अनेक गाये मोबाइल नेटवर्कचिना असल्याने मतदान प्रक्रियेत वन व पोलिस विभागाच्या वॉकीटॉकीचा वापर करण्यात येत आहे.

मेळघाट मतदारसंघातील रक्षा, कुंद्र, रंगुबेली, खोपमार, चोपण, बोकडा, खामटा, किन्हीखेडा, खुटीटा, सुमिता, मारिता, सरोवरखेडा, रायपूर, बोराख्या, माखला, माडीझडप, चुनखडी, नवलगाव, बिचायखेडा आदी गाये विद्युत पुरवठ्याअभावी अंधारातय आहेत.

पॉवर बँकेचा जोड अन् रनरची साथवॉकीटॉकीचीही रेंज नसलेल्या गावात मतदान आकडेवारी सांगणे व कुठलीही अडचण आल्यास एक कर्मचारी (स्नर) वाहनाद्वारे रेंज असलेल्या भागात पोहोचतो व एआरओना फोन करतो. शिवाय विद्युत पुरवठा नसलेल्या गावांत केंद्रांसाठी पॉवर बैंक देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४MelghatमेळघाटAmravatiअमरावतीVotingमतदान