शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

निसर्गप्रेमींनी घेतला अरण्याचा रोमांचकारी अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 5:00 AM

निसर्गप्रेमी, तसेच पर्यावरण व वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने मचाण आरक्षणाची संधी देण्यात आली. त्यात केवळ साडेसातशे रुपये आकारून जेवण, नास्ता, पाण्याची कॅन, मचाणापर्यंत पोहोचविणे व आणण्यासाठी वाहनव्यवस्था पुरविण्यात आली. निसर्गप्रेमींसोबत मचाणावर एक वनकर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आला. वडाळी वनरिक्षेत्र अंतर्गत पोहरा, वडाळी आदी भागात वन्य प्राणी गणनेत पक्षी, प्राण्यांची नाेंद ट्रॅप  कॅमेऱ्यात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  मेळघाटच्या अरण्यात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात मचाणावर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांचे निरीक्षण व जंगलातला रात्रीचा रोमांचकारी अनुभव निसर्गप्रेमींनी घेतला. पूर्वी प्राणिगणनेच्या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला. आता गणनेसाठी अधिक शास्त्रशुद्ध पद्धत अवलंबली जाते. तथापि, नागरिकांना अरण्यानुभव मिळण्याचे पूर्वीच्या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम कायम ठेवण्यात आला व  ‘निसर्ग अनुभव’ या जनजागृती उपक्रमात रूपांतरित करण्यात आला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे सिपना, अकोट, गुगामल, मेळघाट वन्यजीव तसेच अकोला, पांढरकवडा आदी वन्यजीव विभागांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला. कोविडकाळामुळे गत दोन वर्षे उपक्रम होऊ शकला नाही. आता निर्बंध दूर झाल्याने उपक्रमांत सहभागासाठी निसर्गप्रेमींमध्ये कमालीचा उत्सुकता व उत्साह होता. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, परभणी, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांतील तसेच मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील निसर्गप्रेमीही उपक्रमात सहभागी होते.चांदण्यात उजळून निघालेले अरण्य, रातकिड्यांचे आणि प्राण्यांचे निरनिराळे आवाज, हवेची झुळूक, पानांची सळसळ आणि पाणवठ्यावर येणारे विविध वन्यप्राणी यांचा अविस्मरणीय अनुभव निसर्गप्रेमींनी यावेळी घेतला. वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, उदमांजर असे अनेक वन्यजीव सहभागींना पाहता आले.निसर्गप्रेमी, तसेच पर्यावरण व वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने मचाण आरक्षणाची संधी देण्यात आली. त्यात केवळ साडेसातशे रुपये आकारून जेवण, नास्ता, पाण्याची कॅन, मचाणापर्यंत पोहोचविणे व आणण्यासाठी वाहनव्यवस्था पुरविण्यात आली. निसर्गप्रेमींसोबत मचाणावर एक वनकर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आला. वडाळी वनरिक्षेत्र अंतर्गत पोहरा, वडाळी आदी भागात वन्य प्राणी गणनेत पक्षी, प्राण्यांची नाेंद ट्रॅप  कॅमेऱ्यात झाली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संचालक ज्योती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सुमंत सोळंके, दिव्या भारती, विभागीय वनाधिकारी किरण जगताप, प्रभाकर निमजे, मनोजकुमार खैरनार यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. पर्यटन व्यवस्थापक स्वप्निल बांगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश तापस यांनी अथक परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प