शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

बोगस रेशनकार्ड रोखण्यासाठी ‘आधार’

By admin | Published: January 11, 2015 10:42 PM

शिष्यवृत्ती योजना, गॅस सिलिंडर पाठोपाठ आता रेशनकार्डदेखील आधारकार्डशी लिंक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील काही जिल्ह्यांत बोगस रेशनकार्डला आळा घालण्यास मदत

दुबार लाभाचे प्रमाणही होणार कमी : जिल्ह्यात साडेपाच लाखांवर रेशनकार्डगजानन मोहोड - अमरावतीशिष्यवृत्ती योजना, गॅस सिलिंडर पाठोपाठ आता रेशनकार्डदेखील आधारकार्डशी लिंक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील काही जिल्ह्यांत बोगस रेशनकार्डला आळा घालण्यास मदत होणार आहे.राज्यात सर्वच जिल्ह्यात बोगस रेशनकार्डची समस्या गंभीर आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासून रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्डाचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकत्वाचा पुरावा देण्यासाठी असामाजिक तत्त्वाकडून बोगस रेशनकार्ड काढण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्य शासनाचेवतीने राज्यात वेळोवेळी बोगस रेशनकार्ड शोधण्यासाठी अनेक मोहीम राबविण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान लाखो रेशनकार्ड रद्ददेखील करण्यात आले आहे. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात बोगस रेशनकार्ड बनविण्यात आले असल्याची शक्यता आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाने आता रेशनकार्डदेखील आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बोगस लाभार्थ्यांना आळा बसून दुबार रेशनकार्ड काढणाऱ्या नागरिकांचे प्रमाणदेखील कमी होणार आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या ५ लाख ६१ हजार ९३५ पात्र शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये योजनानिहाय डाटा एन्ट्री झालेल्या शिधापत्रकांची संख्या ५ लाख ८९ हजार ६७८ आहे. योजनानिहाय शिधापत्रिकाधारकांची संख्या ३ लाख ४७ हजार २७८ आहे. योजनानिहाय शिधापत्रिका व्हावयाची संख्या २ लाख १५ हजारासह आहे. व्हॅलीडेशनचे प्रमाण जिल्ह्यात ६२ टक्के आहे. ही सर्व कार्ड संगणकीकृत करण्यात आली असून डाटा एन्ट्रीचे काम सुरूच आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने सर्व रेशनकार्ड आधार लिंक करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.