सोडण्यात आले.भातकुली तालुक्यातील उत्तमसरा येथील रहिवासी मंगेश सायंके हे कुटुंबासह काही दिवसांकरिता बाहेरगावी गेले होते. गुरुवारी परतल्यानंतर त्यांना घराच्या दाराजवळ त्यांना सापाची कात आढळली. त्याकडे दुर्लक्ष करीत ते दैनिक कार्यात मग्न झाले. सायंकाळी अंथरूण टाकत असताना त्यामधून कोब्रा नागाचे पिलू बाहेर पडले. मंदा सांयके यांनी तातडीने तातडीने मुलांना घराबाहेर काढले व वसा संस्थेचे ॲनिमल्स रेस्क्यूअर भूषण सांयके यांना तातडीने कळविले. भूषण सायंके यांनी हा छोटा नाग पकडला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकघरातील तुराटीच्या कुडावर नागाची आणखी दोन पिले दृष्टीस पडली. त्यामुळे संपूर्ण कुडच काढण्यात आला. दिवसभराच्या शोधकार्यात कोब्रा नागाची एकूण २२ पिले काढून त्यांना जारमध्ये बंद केले.
वसाचे अनिमल्स रेस्क्यूअर भूषण सायंके, पंकज मालवे यांनी या सापांची वनविभागात नोंद केली व जवळच्या पोहरा येथील नैसर्गीक अधिवासात सोडले. यावेळी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित हाते.