अमरावती : शहरात दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. रविवारपर्यंत ३९ अंश सेल्सिअस गेलेले तापमान सोमवारी २८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मंगळवारी सकाळपासून शहरात पावसाची रिपरिप होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळही नेहमीपेक्षा कमी झाली आहे.
------------
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना बायपासवर एमएच २७ एडी ३३४७ क्रमांकाच्या दुचाकीने निघालेले उमेश कोंडप्पा कल्याणकर (६३, रा. जलारामनगर, अमरावती) यांना एमएच २७ बीई ४४३१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने धडक दिली. २२ जानेवारी रोजी घडलेल्या या अपघातात ते ठार झाले. याप्रकरणी त्यांचे जावई नितीन नाचोणे (३६, रा. पार्वतीनगर) यांच्या तक्रारीवरून चालक किशोर श्रीराम बोरकर (रा. विद्यापीठ कॉलनी) याच्याविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३८, ३०४ अ सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
---------
दुकानाच्या गल्ल्यातून १४ हजार रुपये लंपास
अमरावती : शहरातील महादेवनगर येथील मेडिकल स्टोअरच्या गल्ल्यातून १४ हजारांची रक्कम गहाळ झाल्याचे संचालक निखील अशोक सव्वालाखे (२६, रा. शिवशक्तीनगर) यांच्या निदर्शनास आले. ९ मार्च रोजीच्या या घटनेप्रकरणी त्यांनी २२ मार्च राजापेठ पोलिसांत तक्रार दिली. तो मुलांचे डायपर विकत घेण्यासाठी आला होता, असे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी भादंविचे कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला.