अमरावती : फ्रेजरपुरा हद्दीतील परिसरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. सदर मुलगी शैक्षणिक कामानिमित्त घराबाहेर पडली. परंतु ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिच्या मोबाईल क्रमांकावर कॉल केले. मात्र, फोन बंद होता. त्यामुळे घटनेची तक्रार कुटुंबीयांनी फ्रेजरपुरा पोलिसात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुध्द अपहरणाचा गुन्हा नोंदविला.
00000000000000000000000000000000000
पत्नीला काठीने मारहाण
अमरावती : मद्यपी पतीने पत्नीला काठीने मारहाण केल्याची घटना बुधवारी परसोडा गावात घडली. ३५ वर्षीय महिलेसोबत तिचा पती नेहमी वाद करीत होता. तिला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. ३१ मार्च रोजी पतीने पत्नीला घराबाहेर काढून सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली. तिला काठीने मारहाण केली. यात पत्नी जखमी झाली. पत्नीने फ्रेजरपुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पती श्रीदास भालचंद्र राठोड (४० रा. परसोडा) विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
00000000000000000000000000000000000000
शहरातून दोन दुचाकी लंपास
आशियाड कॉलनी, कोर्टाजवळील घटना
अमरावती : शहरात पुन्हा दुचाकी चोरांचा धुमाकूळ वाढल्याचे दुचाकी चोरीच्या घटनांवरून निदर्शनास येत आहे. गाडगेनगर हद्दीतील आशियाड कॉलनी आणि कोर्टाजवळून या दुचाकी लंपास केल्या आहेत. वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील आशियाड कॉलनी स्थित साई निर्माण अपार्टमेंटमधून एका रहिवाशाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना ३१ मार्च रोजी उघडकीस आली. प्रदीप रमेश देशमुख (३९ रा. आशीयाडकॉलनी) यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये दुचाकी उभी केली होती. तेथून ती दुचाकी चोराने लंपास केली. प्रदीपने या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.
बॉक्स
कोर्टाजवळून दुचाकी लंपास
ज्ञानेश्वर किसन मासोदकर (४३ रा. जेवडनगर) यांनी एमएच २७ एई ६७४६ या क्रमांकाची दुचाकी कोर्टाजवळील परिसरात उभी केली होती. ते काम आटोपून परतले असता, त्यांना दुचाकी दिसली नाही. चोराने दुचाकी लंपास केल्याचे ज्ञानेश्वर यांच्या लक्षात आले. ज्ञानेश्वर मासोदकर यांनी याची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंदविली.