शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

प्रियकराच्या मदतीने बहिणीच्या मुलाचे अपहरणनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2021 5:00 AM

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एक दाम्पत्य काही वर्षांपूर्वी सुरत येथे स्थायिक झाले. मागील पाच वर्षांपासून त्याची  पत्नी  पूनम (नाव बदललेले)  एका अविवाहिताच्या प्रेमात पडली.  दोन महिन्यांपासून ती दोन मुलांसमवेत ती सुरत येथेच स्वतंत्र राहू लागली. त्यांच्यात खटके उडू लागल्याने पतीने आपली दोन्ही मुले सुरक्षितरीत्या पत्नीच्या ताब्यातून अमरावतीला आणली. ते पूनमला सहन झाले नाही. मुलाला परत आणण्यासाठी तिने प्रियकर कुणाल विठ्ठल वडवाडे (२४, मु. दोनद, ह.मु. सुरत) याच्यासोबत कट रचला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रियकराच्या मदतीने एका महिलेनेच स्वत:च्या बहिणीच्या मुलाचे शस्त्राच्या धाकावर अपहरण घडवून आणले. मात्र, राजापेठ पोलिसांच्या सजगतेने ते नाट्य फसले. अपहृत मुलाची सोडवणूक करण्यात आली. तर त्या महिलेसह, तिचा प्रियकर व अन्य दोघे अशा एकूण चौघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चार धारदार चाकू, दोन दुचाकी, मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला. सामरानगर भागात मंगळवारी दुपारी हा थरार घडला. चौघेही आरोपी सुरत येथील रहिवासी आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एक दाम्पत्य काही वर्षांपूर्वी सुरत येथे स्थायिक झाले. मागील पाच वर्षांपासून त्याची  पत्नी  पूनम (नाव बदललेले)  एका अविवाहिताच्या प्रेमात पडली.  दोन महिन्यांपासून ती दोन मुलांसमवेत ती सुरत येथेच स्वतंत्र राहू लागली. त्यांच्यात खटके उडू लागल्याने पतीने आपली दोन्ही मुले सुरक्षितरीत्या पत्नीच्या ताब्यातून अमरावतीला आणली. ते पूनमला सहन झाले नाही. मुलाला परत आणण्यासाठी तिने प्रियकर कुणाल विठ्ठल वडवाडे (२४, मु. दोनद, ह.मु. सुरत) याच्यासोबत कट रचला. ती कुणाल व अन्य दोघांना घेऊन दोन दुचाकीने चक्क सुरतहून मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास अमरावतीत पोहोचली. सामरानगर येथे राहत असलेल्या बहिणीच्या मुलाचे अपहरण करायचे, त्याच्या सुटकेच्या मोबदल्यात आपला मुलगा परत मागायचा,  असा तो कट होता. त्यानुसार, आरोपी कुणालने अमरावतीत पोहोचल्यानंतर पूनमच्या बहिणीला फोनवरून धमकी दिली. त्याबाबतची तक्रार देण्यास ती राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचली असताना, कुणाल व अन्य दोघे हाती चाकू घेऊन सामरानगर परिसरातील त्या घरात शिरले. चाकूचा धाक दाखवत त्यांनी पूनमच्या बहिणीच्या १२ वर्षीय मुलाचे अपहरण केले. त्याला दुचाकीवर घेत त्यांनी पळ काढला. ही माहिती पूनमच्या आईने तिला दिली.  माहिती देताच पोलिसांनी आरोपींना नवाथेमधून अटक केली.

पूनम थांबली शारदानगरातयाप्रकरणी कृणाल वरवाडे, अनिल धरमसिंग सरवय्या (२४, सुरत) व विशाल यादव (१८, सुरत) यांना अटक करण्यात आली. त्यांचेकडून चाकू व नवी कोरी मोपेड जप्त करण्यात आली. सूत्रधार पूनम ही शारदानगर भागात थांबली असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यावरून तिला अटक करण्यात आली. तिच्याकडून अन्य एक दुचाकी जप्त करण्यात आली. चाैघांविरुद्ध कट रचणे, अपहरण व आर्मॲक्टअन्वये गुन्हा नोंदविला. कृणालवर सुरत येथे तीन, तर अनिलवर हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली. ही कारवाई सीपी डॉ. आरती सिंह व डीसीपी विक्रम साळी यांच्या नेतृत्वात राजापेठच्या डीबी स्कॉडने यशस्वी केली.

 

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिस