लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: अ.भा. वि. परिषदेतर्फे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास विद्यापीठावर छात्रगर्जना मोर्चा काढण्यात आला.विद्यार्थ्यांचे हित साधणाऱ्या अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.या मागण्यांमध्ये कोविड १९ मुळे रद्द करण्यात आलेल्या परिक्षांचे शुल्क परत करण्यात यावे, प्रवेश प्रक्रिया शुल्कात शिकवणी शुल्क वगळता बाकी शुल्क माफ करण्यात यावे, विद्यार्थ्यांना वार्षिक शुल्क भरण्यास चार टप्पे देण्यात यायवे, बढती दिलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनाची सोय करून देण्यात यावी. बॅकलॉग परिक्षेबाबत विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट करावी, विद्यार्थी प्रवेशाचा कोटा वाढवून द्यावा, अशा स्वरुपाच्या अनेक मागण्या या विद्यार्थी संघटनेने केल्या आहेत.या मोर्चाला विद्यापीठाबाहेरच अडवण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी तेथेच घोषणा दिल्या.
अमरावती विद्यापीठावर अभाविपचा छात्रगर्जना मोर्चा; विविध मागण्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 1:58 PM