शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
3
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
4
आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणेत खळबळ
5
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
6
तीन वर्षांत बावनकुळेंच्या संपत्तीत ३९ टक्क्यांनी वाढ; नावावर एकही कार नाही
7
"वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट
8
Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका
9
महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना ८७, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना किती जागा?
10
ऑनलाइन बेटिंगशी संबंधित वेबसाइटवर ईडीचा छापा, करोडोंची मालमत्ता जप्त
11
AI'च्या मदतीने अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने यशस्वी ऑपरेशननंतर खुलासा केला
12
नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
13
"आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही"; मलिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपची स्पष्ट भूमिका
14
हरिद्वारमध्ये ट्रेन उडवण्याचा कट; ट्रॅकवर आढळला डेटोनेट, संशयित तरुण ताब्यात
15
काँग्रेसने तिकीट दिलं, पण एबी फॉर्मच दिला नाही; दिलीप मानेंनी अपक्ष भरला अर्ज
16
IND vs NZ : भारताला भारतात पराभूत करणं शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिलं - टीम साऊदी
17
हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर
18
अचानक Instagram डाऊन; मेसेज पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस...
19
महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती?
20
'दाऊदचा साथीदार फडणवीसांच्या जवळ..', मलिकांच्या उमेदवारीवरुन चतुर्वेदींची बोचरी टीका

अभिजित अडसूळ करोडपती ४.६८ कोटींच्या संपतीची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:27 AM

Amravati : शपथपत्रानूसार १५ कोटींची स्थावर मालमत्ता अन् ५.१२ कोटींचे दायित्व

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दर्यापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार अभिजित अडसुळ हे आतापर्यंत दाखल उमेदवारी अर्जात सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहे. त्यांच्याकडे ४.६८ कोटींची जंगम अन् १५ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे शपथपत्रातील नोंदीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे ४५० व पत्नीकडे ८०० ग्रॅम सोने आहे. 

अडसुळ यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत त्यांनी शपथपत्र जोडले. त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा नाही. आयकर विवरणपत्रानुसार २०२४-२५ मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न ३१,५१,६१० रुपये आहे. त्यांच्याकडे १,५७,५०० रुपये रोख आहे. बँक ऑफ बडोदा कांदिवली ९,२९,७५१ रुपये, एचडीएफसी, कांदिवली १,६६,४३७ रुपये, आयसीआयसीआय ३,६९,०९१ रुपये, एसबीआयमध्ये १७,९०,६५१ रुपये आहेत. बैंक ऑफ बडोदामध्ये ५६,०३,५३८ रुपयांची मुदत ठेव आहे. युआरव्ही कन्सल्टन्सीमध्ये १,७६,९८२, युआरव्ही डेव्हलपर्समध्ये १,१३,०९,१७२ रुपयांची गुंतवणूक आहे. कृष्णकांत चतूर १ लाख, मित्र व नातेवाईकांकडून ८,०९४४२ रुपये, निमिषा गजाकोष २९ लाख, पारिजात कन्स्ट्रक्शन २६ लाख, कल्पेशन मिस्त्री १.३० कोटी, युआरव्ही डेव्हलपर्स १२.८६ लाख व युआरव्ही फुड २,०७,६५५ रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांच्या मालकीचे १७ लाखांचे वाहन आहे.

सातारा जिल्ह्यात शेत अन् मुंबई परिसरात प्लॅट सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील मौजा शिरंबे येथे ४१ लाखांचे शेत, कांदीवली पूर्व येथे दुकान (बाजारमुल्य २ कोटी), अंजनगाव येथे फ्लॅट, मौजे वाढवण, कांदीवली येथे कल्पतरू गार्डन येथे २ व कल्पतरू विएंता टॉवर येथे २ फ्लॅट एकूण मूल्य १५.१६ कोटी आहे. शपथपत्रातील नोंदीनूसार ५,१२,५८,१८० रुपयांचे कल्पतरू विएंता यांचे दायित्व आहे. अडसुळ यांच्या पत्नीकडे १,०६,७३,९५३ रुपयांची जंगम व ६० लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४amravati-acअमरावतीElectionनिवडणूक 2024daryapur-acदर्यापूर