इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये २० टक्के अल्कोहोलिक रुग्णांचा समावेश तपासणीअंती आढळून येत आहे. शासनाने मद्यसेवनावर नियंत्रण आणल्यास प्रत्येक रुग्णालयातील गर्दी निश्चित कमी होईल. यातून आरोग्यहित निश्चित साध्य होईल, असा विश्वास इर्विन रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूंनी व्यक्त केला.जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी वार्ड क्रमांक ८ मध्ये ४८ रुग्ण उपचार घेताना आढळले. त्यात वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भारसवाडा येथील रुग्ण दिवाकर नामदेवराव काकडे यांच्या पोटात पाणी होऊन आकार वाढत आहे. ते अवघे ३५ वर्षांचे असताना त्यांच्यावर ही वेळ केवळ दारू सेवनामुळे आली. जानेवारी २०१९ पर्यंत १९ हजार रुग्ण दाखल झालेत. येथे नि:शुल्क सेवा मिळत असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपºयातून रुग्णांची आवक आहे. यामध्ये अल्कोहोलने बाधित रुग्णांची संख्या २० ते ३० टक्क्यांवर असल्याचा रोजचा अनुभव वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला. यामध्ये यकृत निकामी झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आढळल्याचे सांगण्यात आले.लक्षणे : अधिक प्रमाणात अल्कोहोल सेवन हेच यकृत निकामी होण्याचे प्रमुख कारण आहे. यकृत निकामी होण्यास ९० टक्के अल्कोहोल, ५ टक्के इन्फेक्शनमुळे तर ५ टक्के जेनेटिक कारणीभूत असते. मद्य सेवन करणाऱ्यांना सुरुवातीला कावीळचा आजार होतो. ती पहिली पायरी असते. यातच सावरून मद्य सेवन पूर्णपणे बंद केल्यास हा आजार कायमस्वरुपी नष्ट होतो. मात्र दुसºया स्टेपमध्ये तात्पूर्ते उपचारावर समाधान मानावे लागते. तिसऱ्या स्टेपमध्ये पोटात पाणी वाढून रुग्ण दगावतो.- ५० टक्के आरोग्य सुधारण्यास वावशासनाने अल्कोहोल प्रतिबंधित केल्यास आजारांचे प्रमाण तर कमी होईलच; परंतु अपघाताचे प्रमाणदेखील घटण्यास मदत होईल. तेव्हाच रुग्णालये ५० टक्के रिकामे राहतील, असा विश्वास वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला.इर्विनमध्ये ३५० रुग्ण घेताहेत उपचारसध्या तीव्र उन्हाचे चटके असह्य झाल्याने व जिल्ह्यातील काही भागांत भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयात गर्दी वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या ३५० रुग्ण दाखल असून, शेकडो रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज करण्यात येत आहे. सोमवारी नव्याने १०० रुग्ण दाखल झाल्याची माहिती मेट्रन मंदा गाढवे यांनी दिली.दारूच्या आहारी जाऊ नका, मद्यसेवनाऐवजी सकस आहार घेऊन आनंदी जीवन जगा, असा सल्ला येथे उपचारार्थ येणाºया रुग्णांना मानसतज्ज्ञांद्वारा समुपदेशन केले जात आहे.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन
एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण 'अल्कोहोलिक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:18 PM
रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये २० टक्के अल्कोहोलिक रुग्णांचा समावेश तपासणीअंती आढळून येत आहे. शासनाने मद्यसेवनावर नियंत्रण आणल्यास प्रत्येक रुग्णालयातील गर्दी निश्चित कमी होईल. यातून आरोग्यहित निश्चित साध्य होईल, असा विश्वास इर्विन रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूंनी व्यक्त केला.
ठळक मुद्देवैद्यकीय सूत्र : मानसिक तज्ज्ञांकडून समुपदेशन