शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

उड्डाणपुलाविषयी प्रशासन निद्रिस्त

By admin | Published: July 09, 2017 12:18 AM

शहराची शान असलेल्या राजापेठ ते इर्विन चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे.

काय चाललंय अमरावतीत : प्रशासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभावलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराची शान असलेल्या राजापेठ ते इर्विन चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही प्रशासकीय यंत्रणा आपली जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न करीत आहे. समन्वयाच्या अभावामुळे अमरावती शहराची शान धुळीस मिळत असतानाही प्रशासन निद्रिस्तच आहे. त्यामुळे काय चाललंय अमरावतीत, असा प्रश्न अमरावतीकरांना भेडसावत आहे. १०० कोटींच्या जवळपास पैसा खर्च करून राजापेठ ते इर्विन चौकापर्यंतचा उड्डाणपूल बांधकाम एमएसआरडीसीमार्फत करण्यात आले. त्यानंतर या उड्डाणपुलाची जबाबदारी नेमकी कुणाकडे हस्तांतरित झाली. त्याची देखभालीची जबाबदारी कुणाची, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत असणारा हा उड्डाणपूल आता बेवारस स्थितीत आहे. उड्डाणपुलावरील रस्ता खडतर झाला असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच उरले नाही. पाणी खाली जाण्याच्या ठिकाणी साचलेल्या मातीत नैसर्गिक वृक्षारोपण झाले आहे. विद्युत बॉक्स तुटफूट झाले आहेत, अशा समस्या अनेक दिवसांपासून उड्डाणपुलावर दृष्टीस पडत आहे. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. आधीच उड्डाणपुलावरून खाली कोसळून अनेक जीव गेले आहेत. दररोज खड्डे व माती दगडांमुळे अपघात घडत आहे. आता आणखी जीव जाण्याची प्रतीक्षा तर शहर प्रशासन करीत नाही, अशी शंका येत आहे. महापालिका म्हणते, आमची जबाबदारी नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते, उड्डाणपुलाची जबाबदारी आमची नाही तर मग अमरावतीकरांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही शासकीय विभाग जबाबदारी झटकत असताना लोकप्रतिनिधी गप्प का? स्वच्छेतेची जबाबदार ही महापालिकेचीच आहे. मग स्वच्छता विभाग काय करीत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आ. देशमुख देतील काय लक्ष ?तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांच्या कार्यकाळात बनलेला राजापेठ ते इर्विन चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था पाहता प्रशासकीय कामांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. सुनील देशमुख हे शहराचे आमदार सुद्धा आहेत. देशमुख शहर विकासासाठी अथक परिश्रम घेत आहे. मात्र, त्यांच्या कार्यकाळात बनलेल्या या उड्डाणपुलाकडे दुर्लक्ष करून चालेल का, याकडे आ.सुनील देशमुख लक्ष देतील काय, असा प्रश्न अमरावतीकर उपस्थित करीत आहेत.