लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बाजार समितीच्या यार्डात २५ काट्यांवर तूर व हरभऱ्याची मोजणी सुरू आहे. ही जरी मोजणी संथगतीने होत असली तरी ज्या शेतकऱ्यांच्या मालाची मोजणी झाली ते हजारो क्विंटल माल बाजार समितीत पडून आहे. नवीन माल ठेवण्यासाठी जागानसल्याने तातडीने गोदाम उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.८ हजार ५५७ शेतकऱ्यांना तुरीचे टोकन दिलेले आहे, त्यापैकी शुक्रवार पर्यंत २१६७ शेतकऱ्यांच्या टोकनवरील मोजणी पूर्ण झाली होती. यामध्ये ६९०२६.४८ क्विंटलची खरेदी झाली, तर २८७५ शेतकऱ्यांनी हरभऱ्याची नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांपैकी फक्त २८९ शेतकऱ्यांची मोजणी झाली आहे. यामध्ये ५,७६३ क्विंटल चना खरेदी केला आहे. यात बहुतांश शेतकऱ्यांचा माल मोजणीनंतर बाजार समितीच्या यार्डातच पोत्यांची थप्पी लावली आहेत. १५ मे पर्यंत तूर खरेदीची मुदत असल्याने उर्वरित हजारो शेतकऱ्यांच्या टोकनवरील मोजणी केव्हा करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. चना खरेदीची शेवटची तारीख २८ मे आहे. तेथे अतिरीक्त गोदामाची आवश्यकता आहे. तेथे मोजणीसाठी मनुष्यबळ व अतिरिक्त काटे वाढविणेही गरजेचे आहे.शेतकऱ्यांना मन:स्तापनोंदणी केलेल्या एका शेतकऱ्याला सातबारानुसार एका एकरासाठी ५ क्विंटल ९० किलोची मर्यादा असून, चनासाठी एकरी ५ क्विंटल ५० किलो खरेदीची मर्यादा आहे. एकाच वेळी २५ पोत्यांच्यावर खरेदी होत नसल्याने एका शेतकऱ्यांचे शंभर पोते तूर विक्री करायची असेल तर त्याला चारवेळा तेथे हजर रहावे लागते. हेच शेतकऱ्यांच्या जिवारी लागत आहे.रोजंदारी तत्त्वावर गोदाम उपलब्ध केलेले आहेत. विलासनगरातील गोदामात माल ठेवण्यासाठी जागा शिल्लक आहे. त्या ठिकाणी तुरीचे व हरभऱ्याचे पोेते पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अमरावती
गोदामा अभावी यार्डात तूर पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 9:56 PM
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बाजार समितीच्या यार्डात २५ काट्यांवर तूर व हरभऱ्याची मोजणी सुरू आहे. ही जरी मोजणी संथगतीने होत असली तरी ज्या शेतकऱ्यांच्या मालाची मोजणी झाली ते हजारो क्विंटल माल बाजार समितीत पडून आहे. नवीन माल ठेवण्यासाठी जागानसल्याने तातडीने गोदाम उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.८ हजार ५५७ शेतकऱ्यांना तुरीचे ...
ठळक मुद्देअमरावती बाजार समिती : १५ मे रोजी केंद्र होणार बंद