शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

प्राणवायू मुबलक, एकाचाही अभावाने जाणार नाही प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 5:00 AM

पीडीएमसीतील प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून दररोज ६८५  सिलिंडर भरता येणार असून ते २७०० रुग्णांना देता येणार आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी व शहरातील खासगी डॉक्टरांनाही ऑक्सिजन सिलिंडरची आता कमतरता पडणार नाही. पीडीएमसी ही सेवाभावी संस्था असल्याने त्यांनी सर्वांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून द्यावे. येथे एमआरआय मशीनसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मैत्री या सेवाभावी संस्थेचे त्यांनी कौतुक केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आता विदर्भ सज्ज आहे. प्राणवायू न मिळाल्याने एकाही रुग्णाचा प्राण जाणार नाही, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्याने अनेकांचे प्राण जात होते. अशावेळी तातडीने विमानतळावर रिकामे टँकर पाठवून विशाखापट्टणम व भुवनेश्वर येथील पोलाद प्रकल्पातून वैद्यकीय प्राणवायू (मेडिकल ऑक्सिजन) विदर्भात आणला, अशी आठवण त्यांनी करून दिली. व्यासपीठावर पालकमंत्री यशोमती ठाकूर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महापौर चेतन गावंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे, सुलभा खोडके, बळवंत वानखडे, प्रताप अडसड, किरण सरनाईक, दादाराव केचे यांच्यासह श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तीनही उपाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. पीडीएमसीतील प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून दररोज ६८५  सिलिंडर भरता येणार असून ते २७०० रुग्णांना देता येणार आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी व शहरातील खासगी डॉक्टरांनाही ऑक्सिजन सिलिंडरची आता कमतरता पडणार नाही. पीडीएमसी ही सेवाभावी संस्था असल्याने त्यांनी सर्वांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून द्यावे. येथे एमआरआय मशीनसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मैत्री या सेवाभावी संस्थेचे त्यांनी कौतुक केले. यावेळी महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर व हर्षवर्धन देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ. रामचंद्र शेळके, ॲड. गजानन पुंडकर, सचिव शेषराव खाडे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, अशोक ठुसे, स्वीकृत सदस्य महेंद्र ढोरे, नरेशचंद्र पाटील, पीएस वायाळ, अमोल महल्ले, पीडीएमसीचे डीन डॉ. अनिल देशमुख, संचालक पद्माकर सोमवंशी  उपस्थित होते. 

मी पैसे खात नाहीमी मंत्रालयात पैसे खात नाही व मला पार्टी चालवायची नसल्यामुळे माझ्याकडे ते काम नाही. मात्र, माझ्याकडे काही सेवाभावी संस्था आल्या, तर त्यांना मी व्हेंटिलेटर सुविधा हॉस्पिटलला पुरवा, असा सल्ला दिला, असे मिश्किलपणे ना. गडकरी यांनी सांगताच खसखस पिकली.

गडकरी साहेबांचे लक्ष ‘घड्याळा’कडे?ना. नितीन गडकरी घड्याळाकडे सतत लक्ष देत आहे, हे मी पाहत आहे. माझेही घड्याळावरच लक्ष आहे, असे हर्षवर्धन देशमुख आपल्या भाषणात म्हणाले. यानंतर सभागृहात हास्यस्फोट झाला. कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे गडकरी असे करीत आहेत, हे सांगायला ते विसरले नाहीत.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी