लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मी अमरावतीत नव्हतो. दिल्लीत असताना महापालिका आयुक्तांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंविच्या ३०७ या प्रकारचे गंभीर गुन्हे माझ्यावर दाखल होतात. हा केवळ राणांना राजकारणातून संपविण्याचा डाव असून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याची भावना आमदार रवि राणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. महापालिकेत १७ फेब्रुवारी रोजी राजापेठ उड्डाण पुलावर परवानगी आणि नियमानुसार शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठराव मंजूर केला. मात्र, आता या ठरावावरून राजकारण सुरू झाले आहे. आमदार राणा यांच्या मते, महापालिका आयुक्तांवर शाईफेकीची घटना निषेधार्ह, पण या घटनेशी काहीही संबंध नाही. निरपराधांवर गुन्हे नोंदविले. कारागृहात पाठविले. सर्वेाच्च न्यायालयाचा दाखला दिला जातो. मात्र, शहरात किती पुतळ्यांना शासनाची मान्यता आहे, हे तरी विरोधकांनी सांगावे. मी राजकीय विरोध समजू शकतो, पण खोटाएफआयआर दाखल करून राजकीय आयुष्य संपविण्याचे षङ्यंत्र योग्य नाही.
महापालिका आयुक्तांच्या हस्ते पुतळा बसविणार राजापेठ उड्डाण पुलावरून महापालिका आयुक्तांनी पुतळा हटविला. पुतळ्यांची विटंबना केली. गोदामात ठेवण्यात आला. मात्र, लवकरच त्याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसेल, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या हस्ते पुतळ्याची स्थापना करण्यात येईल. तेच पुतळ्याला हारार्पण करून वंदन करतील, असेही आमदार राणा यांनी सांगितले.
- तर शासनाकडून ठराव विखंडित करून आणामहापालिका आमसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापनेबाबत ठराव मंजूर केला. मात्र, हा ठराव अयोग्य असेल, तर विरोधकांनी शासनाकडे जाऊन तो विखंडित करून आणावा. शासन तुमचे आहे. सर्वेाच्च न्यायालयाची भाषा करून कायदेपंडित असल्याचा देखावा न करता शिवरायांप्रति विचार, श्रद्धा जोपासावी, असे आमदार रवि राणा म्हणाले.