- चेतन घोगरे
अमरावती : महिनाभरापासून रेती व्यावसायिकांकडून लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या फरार आयपीएस विजयकृष्ण यादव याचा १४ फेब्रुवारीला नांदेड सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्याला दोन आठवडे होऊनही अमरावती एसीबी तपास त्याचा शोध घेऊ शकले नाही. त्यामुळे एसीबी विभागाच्या कार्यवाहीवर संशय निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे फरार आयपीएस यादवच्या औरंगाबाद खंडपीठातून अंतरिम जामिनाची वाट तर पाहत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सहा दिवसांत नांदेड, औरंगाबाद, हैद्राबाद व इतर शहरांमध्ये शेकडो किलोमीटरचा प्रवास करूनसुद्धा एसीबी तपास पथकाला फरार आपीएस यादव गवसले नाही. अखेर यादवांनी आजपर्यंत वापरलेल्या मोबाईल नंबरचा शोध घेऊन तपास करत असल्याचे अमरावती एसीबी विभागाचे अधीक्षक श्रीकांत धिवरे हे गुन्हा दाखल झाल्यापासून एकच वाक्य सांगत आहे. नांदेड सत्र न्यायालयाने फरार आयपीएस यादवचा जामीन अर्ज २० दिवसांपूर्वी फेटाळून लावला. त्यानंतर यादव मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अंतरिम जामीनासाठी अर्ज करणार असल्याचे बोलले जात होते, तसेच पोलीस सूत्रानुसार, मागील दोन दिवसांपासून फरार यादव औरंगाबाद न्यायालयात वकीलामार्फत जामीन अर्ज दाखल करण्यासाठी येऊन गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, एसीबी तपास पथकाला याची कर्णोपकर्णी खबरही नसणे, हे संशयास्पद वाटते. अमरावती जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार राज्य उन्हाळी अधिवेशनात हे तारांकित प्रश्न उपस्थित करणार होते. पण, त्यांना दिल्लीहून वरिष्ठ नेत्यांनी न मांडण्याची तंबी दिल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणावर एसीबी व पोलीस विभागात चर्चा सुरू आहे.
जामीनासाठी वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्नफरार आपीएस यादव तेलंगणा गृहमंत्री सचिवामार्फत औरंगाबाद खंडपीठातून अंतरिम जामीन मिळण्यासाठी प्रयत्नरत असल्याची माहिती आहे.
तपास पथक यादवच्या सासरी जाणार अमरावती लाचलुचपत विभागाचे तपास अधिकारी पथक फरार आपीएस यादव याच्या सासरकडील मंडळीकडे जाऊनसुद्धा तपास करणार आहे, असे एसीबी विभागाकडून सांगण्यात आले.