लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दोन दिवसांपासून पावसाने दमदार आगमन केल्याने कावली परिसरातील शिवारात आंतरमशागतीला वेग आल्याचे चित्र आहे.
मृग नक्षत्रांत दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य लोपले होते. शेतकरी निराश झाला होता. यावर्षीही सोयाबीनला फाटा देत मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी केली. परंतु, पावसाचा पत्त नसल्याने शेतकऱ्यांच्या क्हऱ्यावर चिंतेचे ढग दाटले होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने आगमन सुरू केल्याने पुन्हा शेतकरी आपला आळस काढून शेतीच्या मशागतीला लागला आहे. तणनाशकाची फवारणी तसेच मजूर उपलब्ध झालेल्या शेतकऱ्यांनी निंदण-खुरपणी सुरू केली आहे.