फोटो पी २५ परतवाडा
परतवाडा : परतवाडा-अमरावती महामार्गावर अष्टमासिद्धीनजीक शुक्रवारी दुपारी ४ वाजता झालेल्या विचित्र अपघातात अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता थोडक्यात बचावले.
शुक्रवारी अमरावती येथे शासकीय बैठकीत असल्याने अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे हे अमरावतीकडे निघाले होते. चालक शासकीय वाहन एम एच २७ ए ए ५५२ त्रिपाठी वाहन चालवीत असताना अचानक चारचाकी व दुचाकी दोन वाहने विरुद्ध दिशेने आल्याने आपसात भिडणार तेवढ्यात वाचवण्याच्या बेतात कार्यकारी अभियंत्यांचे वाहन खाली कोसळले. झाडाला अडल्यामुळे मोठा अनर्थ टाळला. मार्गावर अपघात होताच वाहतूक खोळंबली होती. कार्यकारी अभियंता यांना कुठल्याच प्रकारची दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी परतवाडा पोलीस दाखल झाले होत.
बॉक्स
भूगावनजीक नायब तहसीलदारांच्या वाहनाला अपघात
।।।।।।।।।।।।।।।
कोट
शुक्रवारी अमरावती बैठक असल्याने जाण्यासाठी निघालो होतो अष्टमासिद्धी नजीक विरुद्ध दिशेने येणारे दोन तीन वाहन अचानक आल्याने वाहनाला अपघात झाला. झाडामुळे वाहन अडकले मोठा अनर्थ टळला.
- चंद्रकांत मेहत्रे,
कार्यकारी अभियंता सा बा विभाग