शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ट्रकचा पाठलाग करताना पोलिसांच्या वाहनाला अपघात

By admin | Published: July 15, 2017 5:26 PM

गोवंशाची अवैध वाहतूक करणा-या ट्रकचा पाठलाग करणा-या तालुक्यातील तळेगाव दशासर पोलिसांच्या गाडीचा चांदूर रेल्वे नजीक अपघात झाला.

ऑनलाइन लोकमत
धामणगाव, दि. 15 - गोवंशाची अवैध वाहतूक करणा-या ट्रकचा पाठलाग करणा-या तालुक्यातील तळेगाव दशासर पोलिसांच्या गाडीचा चांदूर रेल्वे नजीक अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. वाहन चालक हेड कॉन्स्टेबल बाबाराव पाटील व कॉन्स्टेबल पवन महाजन अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
प्राप्त माहितीनुसार. देवगाव चौफुलीवरून गोवंशाची अवैध वाहतूक करणा-या ट्रकची माहिती मिळाल्यावर बाबाराव पाटील व पवन महाजन यांनी पोलीस जीप घेऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला. भरधाव असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला होता. मात्र चांदूर रेल्वे नजीकच्या देवीच्या मंदिराजवळील वळणावर पोलिसांची जीप अनियंत्रित झाली व रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात चालक बाबाराव पाटील यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तर पवन महाजन हे देखीग गंभीर जखमी आहेत. 
 
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती स्थिर आहे. तळेगाव पोलिसांच्या हद्दीतून जाणाºया महामार्गावरून रेती व गोवंशाच्या अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेकदा या मार्गावर पोलीस कारवाई केल्यानंतरही ट्रक चालक कुणालाच जुमानत नसल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे.