अष्टमासिद्धीजवळील घटना : तीन वाहने भिडली
परतवाडा (अमरावती) : परतवाडा-अमरावती महामार्गावर अष्टमासिद्धीनजीक शुक्रवारी दुपारी ४ वाजता झालेल्या विचित्र अपघातात अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता थोडक्यात बचावले.
शासकीय बैठक असल्याने अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे हे शुक्रवारी अमरावतीकडे निघाले होते. सदर शासकीय वाहन (एमएच २७ एए ५५२) त्रिपाठी हे वाहन चालवित होते. अचानक चारचाकी व दुचाकी दोन वाहनांविरुद्ध दिशेने आल्याने आपसात भिडणार तेवढ्यात वाचवण्याच्या बेतात कार्यकारी अभियंत्यांचे वाहन चालकाने रस्त्याखाली आणले. झाडाला अडल्यामुळे मोठा अनर्थ टाळला. मार्गावर अपघात होताच वाहतूक खोळंबली होती. वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी परतवाडा पोलीस दाखल झाले होते.
अपघातात चालकासह चौघे जखमी
कांडली येथील साई नगर निवासी विलास खोडस्कर आपल्या आई-वडिलांना कार (एमएच २७ डीए ०२६१) ने येत असताना ती शासकीय वाहनावर जाऊन आदळली. यात खोडस्कर यांना दुखापत झाली. कांडलीतील वनश्री कॉलनी येथील दिनेश धुंदाळे यांच्या दुचाकी (एमएच २७ सीटी १६२१) लाही शासकीय वाहनामुळे अपघात झाला. ते दोन मुले व पत्नीसह अमरावतीहून परतवाड्याला येत होते. त्यात दिनेश धुंदाळे व मुलगा सोहम (५) या दोघांच्या हातापायाला गंभीर दुखापती झाल्या. त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे भर्ती करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाहनचालक त्रिपाठी यांनाही किरकोळ दुखापत झाली.
-------------------
बॉक्स
भूगावनजीक नायब तहसीलदारांच्या वाहनाला अपघात
अचलपूर तहसील कार्यालयाच्या वतीने तहसील आपल्या दारी या अभियाना अंतर्गत शासकिय कामाचा निपटारा करत अचलपूर करीता निघालेले नायब तहसीलदार, तलाठी यांच्या वाहनाला भूगांव नजिक पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत अपघातात नायब तहसीलदार सोळंके किरकोळ जख्मी झाले आहे.
-----------
कोट
शुक्रवारी अमरावतीला बैठक असल्याने जाण्यासाठी निघालो होतो. अष्टमासिद्धीनजीक विरुद्ध दिशेने येणारी दोन-तीन वाहन अचानक आल्याने वाहनाला अपघात झाला. झाडामुळे वाहन अडकल्याने मोठा अनर्थ टळला.
- चंद्रकांत मेहत्रे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग