लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इर्विन चौकापासून १०० फुटांवरच असणाºया ‘मर्च्युरी पॉईन्ट’ याअपघातप्रवण स्थळाने आणखी एक बळी घेतला. बुधवारी सायंकाळी चार वाजता भरधाव टिप्परखाली चिरडून महिला ठार झालीे. यापूर्वी झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या केवळ नावापुरत्याच ठरल्याचे यावरून दिसून येत आहे.इर्विन चौकाकडून राजापेठ उड्डाणपूलाकडे जाणाºया मार्गावर असणाºया ‘मर्च्युरी पॉईन्ट’वर काही महिन्यापूर्वी एका सायकलस्वाराचा टिप्परखाली आल्यानेच मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन महिन्यानंतर इर्विन चौकातच एका वृध्दाचा टिप्परखाली चिरडून मृत्यू झाला होता. आता पुन्हा टिप्परखाली आल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आणखी किती बळी घेण्याची प्रतीक्षा आहे, असे अपघात मालिकेवरुन दिसून येते. सुपर स्पेशालिटीतील पॅथालॉजीत कार्यरत प्रतिभा संजय भगत (३५ रा.हमालपुरा) ही महिला बुधवारी सायंकाळी कर्तव्य संपल्यानंतर हमालपुºयाकडे जात होती. ‘मर्च्युरी पॉईन्ट’ वरून मोपेड वाहन क्रमांक एमएच २७ एएस-६६७९ ने रस्ता ओलांडत असताना अचानक राजापेठकडून इर्विनकडे जाणाºया भरधाव टिप्पर क्रमांक एमएच २७ एक्स-४४५१ प्रतिभा यांच्या मोपेड वाहनाला फरफटत नेले. टिप्परखाली आल्याने प्रतिभा यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान नागरिकांनी तत्काळ प्रतिभा यांना ट्रकखालून बाहेर काढले आणि इर्विनमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती वाहतूक पोलिसांना मिळताच त्यांनी ट्रक चालकाला कोतवाली ठाण्यात नेले. पोलिसांनी टिप्पर जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनीही अपघाताची चौकशी केली.उड्डाणपूलावरील वाहतुकही ठरूशकते अपघातास कारणीभूतबेवारस स्थितीत पडलेला राजापेठ ते इर्विन चौकापर्यंत उड्डाणपूल या मार्गावरील अपघातास कारणीभूत ठरू शकतो. राजापेठकडून इर्विनकडे येणारी भरधाव वाहने ही मर्च्युरी पॉईन्टवरूनच समोर जातात. उड्डाणपूलावरून भरधाव वेगाने जात असताना वाहनचालक रस्ता ओलांडणाºया वाहनांकडे दुर्लक्ष करतात. अशाप्रसंगी हे अपघात घडतात.
‘मर्च्युरी पॉईन्ट’वर आणखी एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 10:09 PM
इर्विन चौकापासून १०० फुटांवरच असणाºया ‘मर्च्युरी पॉईन्ट’ याअपघातप्रवण स्थळाने आणखी एक बळी घेतला.
ठळक मुद्देटिप्परखाली आल्याने महिला ठार : प्रशासनाच्या उपाययोजना नावापुरत्याच