संत्रा उत्पादकांची मागणी : अन्यथा इच्छामरणाची परवानगी हवी वरुड : अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादकांची मोठी संख्या असून २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवर संत्रापीक घेतले जाते. यामध्ये मृग आणि आंबिया असे दोन बहर घेतली जाते. परंतु प्रक्रिया होत नसल्याने आणि परप्रांतीय बाजारपेठेत मागणी नसल्याने संत्रा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ संत्रा उत्पादकावर आली आहे. त्या भावातही व्यापारी खरेदी करीत नसल्याने शेतकऱ्यांपुढे सुलतानी संकट उभे ठाकले आहे. संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च काढणेही दुरापास्त झाले. यामुळे ेकर्जाचा भार वाढत असल्याने शासनाने संत्र्याला ऊसाप्रमाणे २५ हजार रुपये प्रतिटन हमी भाव द्यावा, अन्यथा इच्छामरणाची परवानगी देऊन ेशतकऱ्यांना मोकळे करावे, अशी मागणी जोर धरत आहे. राज्यातून केवळ विदर्र्भात संत्राचे उत्पादन घेतल्या जाते. वरुड तालुक्यात संत्रा लागवडीखाली २१ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा पिकाखाली आहे. गत चार वर्षांपासून सतत गारपीट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याने मृग बहरापेक्षा आंबिया बहराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली. यावर्षी मोठ्या प्रमाणावर आंबिया बहराची संत्री आहेत. पण प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्रा उत्पादकांना अखेरची घरघर लागली आहे. परप्रांतिय बाजारपेठेत भाव गडगडल्याने सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्र्याला ५०० ते ८०० रुपये प्रतिहजार संत्र्याकरीता मोजावे लागत आहे. मध्य प्रतिच्या एका संत्रा झाडावर साधारणत: ८०० ते १२०० फळे असतात. एका झाडाच्या देखभालीचा आणि मशागतीचा खर्चर् बेगण्या लावणीपर्यंत ८०० ते एक हजार रुपये असल्याने मेहनत काढणेही कठीण झाले आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून शेतकऱ्याकडून कृषिमालमाध्ये ज्वारी, तूर, कापूस, ऊस, संत्रा कलमा यासह आदी पिकांना शासनाकडून हमीभावाने खरेदी केली जाते. याच धर्तीवर संत्रासुध्दा हमीभावाने राज्य शासनाने खरेदी करून वायनरी, रस प्रक्रिया केंद्र तसेच आदी उत्पादनामध्ये ेवापर केल्यास बहुगुणी संत्राला चांगले दिवस येतील, अशी संत्रा उत्पादकांची अपेक्षा आहे. देशातील विविध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनीसुध्दा हमीभावाने संत्रा खरेदी केल्यास संत्र्यापासून तयार होणारी विविध खाद्यपदार्थ तयार केल्यास याचा लाभ शेतकरी तसेच व्यावसायिकांना होऊ शकते. थेट विक्रीला महत्त्व प्राप्त झाल्यास अधिक भाव मिळण्यास सुरुवात होईल. याकडे शासनाने कधीही लक्ष केंद्रित केले नसल्याने संत्रा उत्पादक उपेक्षित रािहला. देशात दारू, बियर, औषधी, आयुर्वेदिक औषधी तसेच भांडी, कपडे धुण्याची डिटर्जेंट पावडर, शितपेये आदींमध्ये संत्र्याचा वापर वाढल्यास पुन्हा संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येतील.
ऊसाप्रमाणे संत्र्यालाही २५ हजार रुपये प्रतिटन हमीभाव द्या!
By admin | Published: November 21, 2015 12:12 AM