शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

कौंडण्यपुरच्या दरोड्यातील आरोपी अवघ्या सहा तासात जेरबंद; चार अटक, दोघे फरार

By प्रदीप भाकरे | Published: February 04, 2024 4:59 PM

ट्रकसमोर दोन दुचाकी आडव्या करून ट्रकचालकाला शस्त्राने मारहाण करून त्याच्याकडील ९२ हजार रुपये रोख लांबविण्यात आली होती.

अमरावती: ट्रकसमोर दोन दुचाकी आडव्या करून ट्रकचालकाला शस्त्राने मारहाण करून त्याच्याकडील ९२ हजार रुपये रोख लांबविण्यात आली होती. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास कौंडण्यपूरनजिक दरोड्याची ती घटना घडली होती. त्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कुऱ्हा पोलिसांनी अवघ्या सहा तासात त्या गंभीर घटनेचा उलगडा केला. अटक आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. चांदूर रेल्वे येथील प्रमोद भोयर (४२) हे एमएच २७ बीएक्स ९५६० या ट्रकने आर्वी येथून ढेप  घेऊन चांदुर रेल्वेकडे येत असतांना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ७.३० दरम्यान कौंडण्यपूरजवळ त्यांच्या वाहनाच्या मागील बाजुने दोन दुचाकीवर तीन ते चार इसम आले.  

त्यांनी  शिविगाळ करून ट्रक थांबविण्यास सांगितला. परंतू भोयर यांनी ट्रक न थांबवता पुढे नेला असता आरोपींपैकी एकाने त्याची दुचाकी पुढे नेऊन ट्रकसमोर आडवी उभी केली. त्यामुळे भोयर यांना आपले वाहन थांबवावे लागले. त्यावेळी दोन दुचाकी वरून आलेल्या आरोपींनी  ट्रकच्या कॅबिनमध्ये शिरत भोयर यांना लाथा-बुक्यांनी व धारदार शस्त्राने मारहाण सुरू केली. त्याचवेळी आरोपींनी त्यांच्या खिशातील रोख ९२ हजार रुपये जबरीने हिसकावले. तथा आरोपी दुचाकीने पळुन गेले. घटनेचे अनुषंगाने कु-हा येथे जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. चार पथके आणि सीसीटीव्ही फुटेजपोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमार कुमावत यांनी मार्गदर्शन करून तपासासाठी कु-हा ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके नेमली.भोयर यांनी आर्वी येथून ज्या ठिकाणाहून ढेप विकत घेऊन ट्रकमध्ये भरली, त्याठिकाणासह मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच ढेप भरणाऱ्या मजुरांची कसून विचारपुस केली. त्यावेळी पोलिसांना मजुरांपैकी नितेश उध्दवराव पुरी (२५, रा. वर्धमनेरी, ता. आर्वी) याचेवर संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.  आरोपी नितेशने दिली कबुलीसाथीदार करण मुगबेलसिंग बावरी (२६), सुरज पद्माकर थुल (२१), गोपाल किसनराव दखणे (२३), विकास मुंद्रे , सुरज गडलिंग (सर्व रा. आनंदवाडी, ता. तिवसा) यांच्या मदतीने तो गुन्हा केल्याची कबुली नितेश पुरी याने दिली.  कबुलीनुसार नितेश पुरीसह करण, सुरज व गोपालला अटक करण्यात आली. तर, विकास मुंद्रे व सुरज गडलिंग हे फरार आहेत. एसपी विशाल आनंद, एएसपी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात कुऱ्हाचे ठाणेदार अनुप वाकडे, सहायक निरिक्षक सचिन पवार, उपनिरिक्षक संजय शिंदे, कुऱ्हा येथील अंमलदार अनिल निंघोट, हेमंत डहाके, सागर निमकर, दर्पण मोहोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :AmravatiअमरावतीArrestअटक