शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

लग्नासाठी ११ वर्षे झुलवणाऱ्या आरोपीला ६ महिने सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 1:04 PM

Amravati News महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन टाळाटाळ केल्याप्रकरणी आरोपीला परतवाडा स्थानिक न्यायालयाने ६ महिने सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

ठळक मुद्दे१० हजार रुपये दंड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन टाळाटाळ केल्याप्रकरणी आरोपीला परतवाडा स्थानिक न्यायालयाने ६ महिने सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रफुल्ल दामोधरपंत धर्माळे (रा.चमक, ता. अचलपूर) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ ए.ए.सईद यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.विधी सूत्रानुसार, २ आॅक्टोबर २००९ रोजी ही घटना घडली. घटनेवेळी पिडिता तिच्या आजारी बहिणीसोबत अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात गेली असता तेथील वॉर्डबॉय प्रफुल्ल धर्माळे याने तिला लग्नाचे खोटे आमीष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर लग्नास नकार दिला. अचलपूर पोलिसांनी त्यावेळी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ४१७, ५०६ व अ‍ॅट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपासी अधिकारी पी. एस. माहुरे यांनी तपास करून दोषारोप पत्र विद्यमान न्यायालयात दाखल केले.न्यायालयाने भादंविचे कलम ३७६ मधून आरोपीस मुक्त करून कलम ४१७, ५०६ व अ‍ॅट्रॉसिटीअन्वये आरोपीला दोषी ठरविले. सहा.सरकारी वकील जी. ए. विचोरे यांनी २२ साक्षाीदार तपासले.युक्तीवादाअंती न्यायालयाने आरोपीला कलम ४१७ मध्ये ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. १० हजार रुपये दंड केला तसेच दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावली. तसेच पिडीताला २० हजार रुपये नुकसान भरपाईचा आदेश दिला. न दिल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात सुरेश गि-हे यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय