शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

साक्षीदार म्हणून सही करण्यास नेले अन् वृद्धाचे २८ लाखांचे घर हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 18:08 IST

साक्षीदार म्हणून अंगठा देणाच्या बहाण्याने आरोपींनी एका वृद्धाचे २८ लाखांचे घर हडपले. १९ जानेवारी रोजी येथील सहायक निबंधक वर्ग-२ चे शाखा क्रमांक ३ या कार्यालयात ही घटना घडली.

ठळक मुद्देतिघांकडून फसवणूक

अमरावती : साक्षीदार म्हणून अंगठा देणाऱ्या एका ८५ वर्षीय वृद्धाचे २८ लाख रुपयांचे घर पैसे न देता हडपण्यात आले. १९ जानेवारी रोजी येथील सहायक निबंधक वर्ग-२ चे शाखा क्रमांक ३ या कार्यालयात ही घटना घडली.

याप्रकरणी नारायणराव अभिमानजी खडगे (८५, विजयनगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी उमेश रघुनाथ महाजन व दोन महिला (सर्व रा. डाबकी रोड, इंदिरानगर) यांच्याविरुद्ध कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, यातील आरोपींनी खडगे यांंना साक्षीदार म्हणून सही करण्यास नेले. ते सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात आरोपींसोबत गेले. तेथे एका ठिकाणी अंगठा मारून परतले. यादरम्यान ऑगस्टमध्ये खडगे यांचा मुलगा घरी आला. तेव्हा आरोपींचे काही कागदपत्रे घरी राहिल्याचे खडगे यांनी मुलाला सांगितले. ती कागदपत्रे पाहिल्यानंतर ते खरेदीखत असल्याचे लक्षात आले.

आरोपींनी नारायणराव खडगे यांचे घर ३ लाख ५८ हजार रुपयांमध्ये खरेदी केल्याचे ते खरेदीखत होते. खरेदीमध्ये खडगे यांना तेवढ्या रकमेचा धनादेश दिल्याचेही नमूद होते, मात्र, प्रत्यक्षात तसा कुठलाही धनादेश किंवा रक्कम न मिळाल्याने खडगे यांनी त्यानंतर उमेश महाजन व अन्य दोन महिलांशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यावर आता तुम्हाला पैसे व घर काहीही मिळणार नाही. त्या घरावर आता आमचा अधिकार आहे, असे खडगे यांना सुनावण्यात आले. सबब, तीनही आरोपींनी आपले २८ लाख रुपये किमतीचे घर स्वत:च्या नावावर करून फसवणूक केल्याचे खडगे यांनी २८ नोव्हेंबर रोजी गाडगेनगर पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीHomeसुंदर गृहनियोजन