अमरावती गुन्हे अन्वेषण विभाग व चांदूर रेल्वे पोलिसांची कारवाई
चांदूर रेल्वे : नजीकच्या चांदूरवाडी येथील सुंदरनगरमधील जडीबुटी यांच्या घरी चोरी झाल्याची बाब शेजारच्या दूधवाल्यांनी लक्षात आणून देताच चांदूर रेल्वे पोलीस व अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाने चोरांचा शोध घेऊन अवघ्या आठ तासांत तिघांना अटक केली.
पोलीससूत्रांनुसार, सुंदरनगर चांदूरवाडी येथील फिर्यादी राजूसिंग सरदारसिंग चितोडिया (४७) याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १० ग्राम सोने चांदीचे दोन कडे, अडीचशे ग्रॅम वजनाचा गळ्यातील चांदीचा हार, साडेसातशे ग्रॅम डोक्यातील केसाला लावण्याचे चांदीचे फूल, १०० ग्रॅम चांदीचे दोन बटन, ५०० ग्रॅम कोरा असा दोन किलो १०० ग्रॅम चांदी ८८ हजार रुपयांचा व पूजेच्या काशी धातूचा गडवा एक लहान सायकल असा एक लाख ३० हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला.
आरोपी उमेश उत्तमराव गलबले (३२), मोहन बबनराव नागोसे (२९) व
विजय शामराव भोयर (२३, सर्व रा. चांदुरवाडी) यांना आठ तासांत अटक केली.
चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते व अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी यांना गुन्हा दाखल करून केला व माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात डॉग स्कॉटला पाचारण केले. डॉक्सकोर्ट सुद्धाचांदूरवाडी पर्यंतपानटपरी जवळ घुटमळत होते त्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास मदत मिळाली व हे सर्व आरोपी चांदूरवाडी येथील असल्याचे गुन्हे अन्वेषण विभाग व चांदूर रेल्वे पोलिसांनी निष्पन्न केले. त्याआधारे आरोपीच्या शोधात गावांत फिरले. हालचाल लक्षात येतात तीनही आरोपींना अटक करून शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संपूर्ण माला हस्तगत केला ठाणेदार मगन मेंहते यांच्या मार्गदर्शनात एपीआय जुमडे तपास करीत आहे.