शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अचलपूर नगर परिषदेचा कचरा डेपो बनले ‘नंदनवन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:54 PM

अचलपूर नगर परिषदेच्या परतवाडा-बेलखेडा रोडवरील कचरा डेपोचे नंदनवन झाले आहे. या कचरा डेपोच्या सात एकर जागेवर पशूपक्ष्यांसह मानवालाही उपयुक्त वनराई, फळ व फुलझाडे, औषधी वनस्पतीसह उद्यान विकसित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपशुपक्षांसह मानवालाही उपयुक्त : फुलपाखरांकरिता १५ हजार चौरस फूट जागा

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगर परिषदेच्या परतवाडा-बेलखेडा रोडवरील कचरा डेपोचे नंदनवन झाले आहे. या कचरा डेपोच्या सात एकर जागेवर पशूपक्ष्यांसह मानवालाही उपयुक्त वनराई, फळ व फुलझाडे, औषधी वनस्पतीसह उद्यान विकसित करण्यात आला आहे.३० ते ३५ वर्षांपासून असलेल्या या परतवाडा कम्पोस्ट डेपोत कचऱ्याचे ढीग लागले होते. सर्वत्र दुर्गंधी होती. या अशा जागेवरील कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करीत बायो-मायनिंग अंतर्गत ही जमीन पूर्ववत योग्य स्थितीत उपयोगक्षम बनविली गेली. चौदाव्या वित्त आयोगाकडून प्राप्त अनुदानातून कचºयावर प्रक्रिया करीत अचलपूर नगरपालिका प्रशासनाने ही साइट रिकव्हर केली. केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अमृत मिशन अभियानांतर्गत या ठिकाणी नगर परिषदेने हरितपट्टा विकसित केला. यात वनराईसह बगीचा निर्माण केला. यावर २०१६ ते २०१९ या तीन वर्षात साडेचार कोटी खर्च केले. पक्ष्यांंकरिता फळझाडं, फुलपाखरांकरिता फूलझाडं, मानवाकरिता वनौषधी वृक्षांसह सर्वच प्रकारची पर्यावरण पूरक वनस्पती यात लावण्यात आली आहेत. आंध्र प्रदेशातील पाम व अशोका वृक्षांसह स्थानिक वृक्षांनी या ठिकाणी आपली मुळं रोवली आहेत.फुलपाखरांसह नागरिकांचीही सोयअमृत मिशन अंतर्गत हरित पट्टा विकसित करताना या सात एकर जागेतील १५ हजार चौरस फूट जागा फुलपाखरांकरिता विकसित करण्यात आली आहे. नागरिकांकरिता याच ठिकाणी ३० हजार चौरस फूट जागेत लॉन विकसित करण्यात आले आहे.राज्यात एकमेवअमृत मिशन अंतर्गत देशपातळीवर ५००, तर राज्यात ४४ शहरे निवडली आहेत. कचरा डेपोच्या जागेवर हरित पट्टा विकसीत करणारे अचलपूर हे त्यांच्यापैकी पहिले शहर ठरले आहे. याची दखल राज्य शासनानेही घेतली आहे. केंद्र व राज्य स्तरावरील दोन खासगी स्वतंत्र यंत्रणेकडून याची त्रयस्थ तपासणीही पार पडली. अर्बन फॉरेस्ट डेव्हलप करणारी अचलपूर पहिली नगरपालिका ठरली आहे.पशूपक्ष्यांसह मानवालाही उपयुक्त असे पर्यावरणपूरक वातावरण कचरा डेपोच्या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहे.- राज अग्रवालविकसक, परतवाडाअमृत मिशन अभियानांतर्गत कचरा डेपोच्या जागेतील कचºयाची विल्हेवाट लावून वनराई, बगीचा, हरित पट्टा विकसित करण्यात आला आहे.- अशोक दुधानी, अभियंता अचलपूर नगरपरिषद