शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

अचलपुरात ठाणेदारावर विळ्याने हल्ला, पत्नीच्या तक्रारीवरून अटक करायला गेले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 8:55 PM

परतवाडा (अमरावती) : पत्नीच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून ताब्यात घेण्यास गेलेल्या एका इसमाने ठाणेदारासह दोन पोलीस कर्मचा-यावर विळ्याने हल्ला केला.

परतवाडा (अमरावती) : पत्नीच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून ताब्यात घेण्यास गेलेल्या एका इसमाने ठाणेदारासह दोन पोलीस कर्मचा-यावर विळ्याने हल्ला केला. यात तिघेही जखमी झाले. ही घटना अचलपूर शहरातील सरमसपुरा ठाणे हद्दीत सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.ठाणेदार अभिजित अहिरराव, पोलीस शिपाई गणेश बेलोकार व माधव ठाकरे असे जखमी पोलिसांची नावे आहेत, तर हल्ला करणा-या आरोपी लल्लू सय्यद कलीम सय्यद हनीफ (४०, रा. मंजुरपुरा, अचलपूर) यास पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, लल्लू सय्यद कलीम हा पत्नी हमीदा बी हिला त्रास देत होता. सोमवारी लल्लूने पत्नीला मारहाण केली. याची माहिती पत्नी हमीदाने भाऊ शेख जलीम अब्दुल राऊफ (रा. आर्वी) व आईला दिली. बहिणीला जिवे मारण्याची भीती वर्तवित सरमसपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून ठाणेदार अभिजित अहिरराव व दोन पोलीस कर्मचारी हे लल्लूला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. दारात पोलीस उभे असल्याचे पाहताच लल्लू संतापला व घरातून विळा आणून पोलिसांवर हल्ला केला. यात डोक्यावर मार लागल्याने ठाणेदार जखमी झाले, तर पोलीस कर्मचा-यांच्या हातावर मार लागला. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.यापूर्वीही केला पोलिसांवर हल्लालल्लू उर्फ सय्यद कलीम हा वेडसर व्यक्ती म्हणून परिचित आहे. यापूर्वी त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून नागरिकांवर दगड घेऊन धावण्यासह विनाकारण मारहाण करण्याचे आरोप त्याच्यावर आहे. मंजूरपुरा या परिसरात त्याची दहशत पसरली आहे.