लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ब्रिटिशकाळापासून मेळघाटला मध्य प्रांताला जोडणाऱ्या दीडशे वर्षे जुन्या रेल्वे मार्गाला बोटावर मोजण्याएवढ्या राजकारण्यांसाठी शहरी भागात वळविण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा रेल्वे मार्ग मेळघाटातून न नेता अन्य ठिकाणाहून नेण्यासाठी पत्र दिले. ते आदिवासीविरोधी असल्याचा आरोप बुधवारी लोकसभा अधिवेशनादरम्यान जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी केला. अचलपूरच्या नॅरोगेज रेल्वेचा मुद्दाही त्यांनी मांडला.मेळघाटातून अकोला-अकोट-धूळघाट रेल्वे-डाबका-देढतलाई ते खंडवा असा ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग परिवर्तीत न करता पूर्वीप्रमाणेच तो मेळघाटातून देण्याची मागणी आदिवासींमधून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मेळघाट हा आदिवासीबहुल परिसर असून, येथे सर्वाधिक संख्या याच समाजाची आहे. रोजगारासाठी कैक दशकांपासून त्यांना मोठ्या प्रमाणात स्थलांतरित व्हावे लागते. शहराच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी हा दीडशे वर्ष जुना रेल्वे मार्ग आदिवासींसाठी वरदान ठरत आहे. रेल्वेव्यतिरिक्त इतर साधने खर्चीक असल्याने ती आदिवासींंना परवडण्याजोगी नाहीत, असे खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे रेल्वेचा शतकोत्तर ब्रिटिशकालीन मार्ग कायम ठेवावा, असे त्या म्हणाल्या. यावर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या नकाशातून मेळघाट गायब होणार नसल्याचे अभिवचन दिले. मेळघाटातील रेल्वे मार्गाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर आदिवासींमध्ये अस्वस्थता आहे. या रेल्वे मार्गाबद्दलची मावळलेली अपेक्षा आता रेल्वेमंत्र्यांच्या उत्तराने उंचावली आहे.अचलपूरची ‘शकुंतला’ सुरूच ठेवालोकसभेत बुधवारी खासदार नवनीत राणा मेळघाट रेल्वे प्रश्नांवर आक्रमक झाल्या. पश्चिम विदर्भाची ब्रिटिशकालीन नॅरोगेज शकुंतला रेल्वे कष्टकरी, श्रमजीवी, शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. मात्र, ती बंद आहे. त्यामुळे शेतकºयांसह अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. मूर्तिजापूर ते अचलपूर मार्गावरील अनेक गावांतील लोकांचे दळणवळणाचे साधन खुंटले आहे. दर्यापूर व अंजनगाव तालुक्यांतील अनेक गावांना लाभ होणार असल्याने शकुंतला रेल्वे सुरू करणे गरजेचे असल्याची मागणी खा. राणा यांनी केली. लवकरच ही रेल्वे सुरू करणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी उत्तर दिले.मुख्यमंत्री आदिवासींचे विरोधी ?अकोला-अकोट-धूळघाट रेल्वे-डाबका-खंडवा रेल्वेचा मार्ग परिवर्र्तित करून मेळघाटबाहेरून रेल्वे मार्ग नेण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांनी दिले. ते आदिवासीविरोधी असल्याचा टोलाही खासदारांनी लगावला. जुना मार्ग कायम राहील व शकुंतला एक्सप्रेससुद्धा लवकरच प्रारंभ करण्यात येईल, असे उत्तर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी खासदारांना उत्तर दिले.
अचलपूरची ‘शकुंतला’ लोकसभेच्या अधिवेशनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 5:00 AM
मेळघाटातून अकोला-अकोट-धूळघाट रेल्वे-डाबका-देढतलाई ते खंडवा असा ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग परिवर्तीत न करता पूर्वीप्रमाणेच तो मेळघाटातून देण्याची मागणी आदिवासींमधून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मेळघाट हा आदिवासीबहुल परिसर असून, येथे सर्वाधिक संख्या याच समाजाची आहे. रोजगारासाठी कैक दशकांपासून त्यांना मोठ्या प्रमाणात स्थलांतरित व्हावे लागते.
ठळक मुद्देमेळघाटातूनच रेल्वेचा मार्ग करा; आदिवासीविरूद्ध राज्यशासन असा सामना ?