पोहरा हाऊसफुल्ल : मेळघाटात पर्यटकांची गर्दी उसळणारलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदाही वैशाख पौर्णिमाच्या दिवशी म्हणजे १० व ११ मे रोजी प्राणिगणना होणार आहे. त्याकरिता वनविभागाने जय्यत तयारी चालविली असून वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन वजा गणना करण्यासाठी काही स्थळ निश्चित करण्यात आले आहे. मात्र त्याकरिता प्रति पर्यटक पाचशे शुल्क आकारण्यात आले आहे. मेळघाट, पोहरा जंगलात वाघ दर्शनासाठी निसर्गप्रेमिंमध्ये उत्सुकता पाहावयास मिळत आहे.पाणवठ्यावर केली जाणारी प्राणिगणना ही कालबाह्य झाली आहे. मात्र, नागरिकांना जंगलाबद्दलची माहिती मिळून त्यांची आस्था कायम राहावी, यासाठी काही वर्षांपासून पाणवठ्याच्या स्थळी वैशाख पौर्णिमेला प्राणिगणना केली जाते. निसर्गप्रेमिंना जंगलाबद्धलचे ज्ञान देखील यामाध्यमातून मिळते. पेंच, मेळघाटात प्राणिगणनेसाठी शुल्क आकारले जात आहे. १० व ११ मे रोजी होणाऱ्या प्राणिगणनेसाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. वाघांसह अन्य वन्यजीवांचे दर्शन घेता यावे, यासाठी मचाण बांधण्यात आल्या आहेत. या मचाणवर बसून वाघांचे दर्शन घेता येईल. ज्या पाणवठ्यांवर हमखास वाघ येतो, त्या स्थळाला निसर्गप्रेमिंचा आॅनलॉईन बुकींगसाठी प्राधान्य जास्त आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने स्थानिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी पाचशे रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मेळघाटात वाघ दर्शनासाठी निसर्गप्रेमिंचे १०० पर्यत ‘वेटींग’ आहे. प्राणिगणनेत एका मचाणवर चार ते पाच व्यक्ती बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सोलर उर्जेद्वारे कृत्रिम पाणवठ्यांवर पाणी सोडले जाते. त्यामुळे या पाणवठ्यांवर हमखास वाघांचे दर्शन मिळणार आहे. त्यामुळे अशा पाणवठ्यांना आॅनलाईन बुकींगमध्ये प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन्ही ठिकाणच्या पाणवठ्यांवर मचाणी तयार करण्यात आल्या आहेत.असे आहे आरक्षणमेळघाटातील चिखलदरा ३०, कोहा ४०, तारुबांदा २०, ढाकणा २०, हरिसाल ३०, कुंड ३०, सेमाडोह ४५, रायपूर २५, जारीदा ३५, हतरु १०, कोलखास १०, चौराकुंड ३५, गुल्लरघाट ३०, अमरावती वनविभागाचे पोहरा १५ अशा पर्यटकांसाठी जागा आरक्षित आहेत. पहिल्यांदाच पोहरा जंगलात प्राणीगणना होत आहे.
आजपासून प्राणीगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2017 12:14 AM