शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

पाणीटंचाई ४७ गावांची तहान विहीर अधिग्रहणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:12 AM

अमरावती : वाढत्या उन्हाच्या तडाख्याबरोबरच पाणीटंचाईची तीव्रता गंभीर होत आहे. यात जिल्ह्यातील ४७ गावांत ५३ विहिरी अधिग्रहित करून ...

अमरावती : वाढत्या उन्हाच्या तडाख्याबरोबरच पाणीटंचाईची तीव्रता गंभीर होत आहे. यात जिल्ह्यातील ४७ गावांत ५३ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. चिखलदऱ्यात ८ व चांदूर रेल्वे तालुक्यात १ अशा ९ गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.

गतवर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या जलस्रोत यंदा मुबलक प्रमाणात असल्याने अनेक तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची झळ कमी गावांना सोसावी लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ग्रामीण भागात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे. या गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोताने तळ गाठला आहे. परिणामी प्रशासनाने आजघडीला १४ पैकी ८ तालुक्यांतील ४७ गावांत मार्च व एप्रिल महिन्यापासून ५३ विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. अधिग्रहित विहिरी व बोअरवरून या गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. शहरात देखील एक ते दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. संभाव्य पाणीटंचाई पाहता त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात सध्याच्या स्थितीत पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या ९ गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय ४७ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करताच पंचायत समितीच्यावतीने विहिरी व बोअरवेलच्या अधिग्रहणाची कारवाई केली आहे.

बॉक्स

विहीर, बोअरचे अधिग्रहण झालेली गावे

नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील शिवरा, शेलूगुंड, पळसमंडळ, नागझरी, बोपी, पिंपरी गावंडा, वेणी गणेशपूर, चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, लवादा, आकी, हतरू, अमरावती तालुक्यातील भानखेडा, मोगरा, कस्तुरा, यावली अंतर्गत नरसिंगपूर, इंदला मौजे घातखेडा, बोडणा(परसोडा)देवरा, पिंपळखुटा, भानखेड खु., धानोरा कोकाटे, चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा, नया सावंगा, निमला, अमदोरी, टेंभुर्णी, सावंगी मग्रापूर, साेनगाव, बग्गी जहागीरपूर, शिरजगाव कोरडे, भातकुलीमधील दाढी पेढी, अचलपूर तालुक्यातील बोर्डी, वाल्मिकपूर, खतीजापूर, कासमपूर, कुंभी वाघोली, कुष्ठा बु., परसापूर, बोरगाव दोरी, वरूडमधील वडाळा, मोर्शी रिध्दपूर, कोळविहीर, गोराळा, आष्टोली, खोपडा, दाभेरी आदी गावांमध्ये विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

बॉक्स

९ गावांना टँकरने पाणीपुरवठा

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात आजघडीला एकझिरा, लवादा, आकी, सोमवारखेडा, मलकापूर, मोथा, धरमडोह, बहादरपूर यासह चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर अशा ९ गावांत पाणीपुरवठ्याची समस्या तीव्र झाली असल्याने या ठिकाणी टँकरव्दारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे.