निवडणुकीची पार्श्वभूमी : ग्रामीण पोलिसांचा धडाकाअमरावती : आगामी जि.प., पं.स. व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली होती. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १ हजार १९८ जणांवर प्रतिधंत्मक कारवाई केली असून ३१० परवानाधारकांजवळील अग्निशस्त्र जमा केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय व गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने आरोपींवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी मोहीम राबवून कलम १०७, ११०, १५१, १४९ तसेच कलम ११०, १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ९३ (ब) मुंबई दारूबंदी कायद्यान्वये १ हजार १९८ जणांवर प्रतिबंधत्माक कारवाई केली. त्याचप्रमाणे अवैध दारू विक्री, वाहतूक करणे किंवा बाळगणे अशा एकूण ५२६ प्रकरण उघड केली. यामध्ये एकूण ४९९ आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून १४ लाख १९ हजार ३४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (प्रतिनिधी)३१० अग्निशस्त्र जप्तआगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहतू नये २२या उद्देशाने अग्निशस्त्र जमा करण्यासाठी संबंधीत परवानाधारकांना कळविण्यात आले होते. त्यानुसार ग्रामीण भागात ६१२ परवानाधारकांपैकी ३१० जणांचे अग्निशस्त्र पोलिसांनी जमा केले आहेत.
१,१९८ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2017 12:05 AM