२ हजार ८२३ रूपयांचा मुद्देमाल जप्त
चांदूर रेल्वे : मालखेड येथे अवैधरीत्या पानमसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात २५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता केली. यात २,८२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड येथे ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात नायक पोलीस अंमलदार पंकज शेंडे, पोलीस अंमलदार महेशप्रसाद, अरुण भुरकाडे, आशिष राऊत, मनोज वानखडे, जगदीश राठोड या पथकाने शुक्रवारी रोजी सायंकाळी आरोपी राहुल विठ्ठलराव दुधे (३०) यांच्या पानटपरीची झडती घेतली असता, त्यात २,८२३ रुपयांचा सुगंंधित तंबाखू, गुटखा व पानमसाला, गुटखा मिळून आला. प्रतिबंधित तो मुद्देमाल अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला. मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास एएसआय राठोड करीत आहे.