लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच तालुक्यातील बँकांनी पीक कर्जवाटपाची कार्यवाही त्वरेने सुरू करावी. अतिरिक्त कागदपत्रांची मागणी बँकेने केल्याचे लक्षात येताच थेट शाखाधिकाऱ्यावर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जाणार असल्याचे निर्देश तहसीलदार अभिजित नाईक यांनी दिले.धामनगाव, तळेगाव दशासर, चिंचोली, देवगाव येथे गुरुवारी पीक कर्ज मेळावे पार पडले. या सर्व केंद्रांवर शेतकºयांची मोठी गर्दी होती. धामणगाव येथे तहसील कार्यालयात आयोजित पीक कर्जवाटप मेळावा पार पडला. बँकेत शेतकºयांना सौहार्दाची वागणूक मिळावी, अशी सूचना तहसीलदार अभिजित नाईक यांनी केली. पीक कर्जवाटपामध्ये तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा मोठा आहे. त्यांचे शेतकरी खातेदारही अधिक आहेत. या बँकांनी पीक कर्जवाटप करताना त्यात सुसूत्रता आणि सहजपणा ठेवावा, असे निर्देशही नाईक यांनी दिले. पीक कर्जवाटपासंदर्भात सविस्तर आढावा घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या. तालुक्यातील खरीप हंगामासाठी शेतकºयांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, जिल्हा बँकेने पूर्ण करावे. शेतकºयाचे पीक कर्जाचे अर्ज बँकांनी स्वीकारावे. सोबतच पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊन त्यांना सहकार्य करावे व सौजन्याची वागणूक देण्याबाबत तहसीलदार नाईक यांनी सूचित केले. मेळाव्यात नायब तहसीलदार कृष्णा सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.
अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:18 PM
खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच तालुक्यातील बँकांनी पीक कर्जवाटपाची कार्यवाही त्वरेने सुरू करावी. अतिरिक्त कागदपत्रांची मागणी बँकेने केल्याचे लक्षात येताच थेट शाखाधिकाऱ्यावर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जाणार असल्याचे निर्देश तहसीलदार अभिजित नाईक यांनी दिले.
ठळक मुद्देपीक कर्जवाटप अभियान : महसूल विभागाचा इशारा