शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
3
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
4
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
5
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
6
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
7
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
8
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
9
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
10
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
11
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
12
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
13
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
14
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
15
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
16
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
17
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
18
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
19
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
20
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

पीक कर्जासाठी जास्तीचे कागदपत्रे मागितल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 5:00 AM

यंदा खरिपासाठी दीड हजार कोटींचे उद्दिष्ट आहे. त्यात जिल्हा सहकारी बँकेचे ४०५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, सुमारे २९० कोटींचे अर्थात ७२ टक्के कर्ज वितरित केले आहे. त्या तुलनेत इतर बँकांचे वितरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी आपले उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी गतीने कार्यवाही करावी. पीक वितरण गतीने होण्यासाठी बँक व्यवस्थापकांनी संबंधित गावांत ग्रामस्तरीय समितीशी समन्वय साधावा.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची तंबी, कर्ज वितरण सुलभ अन् गतिमान करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती  : कोरोना संकटकाळात  शेतकरी बांधवांनाही विविध संकटांचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर खरिपासाठी पीक कर्जाचे सुलभ वितरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी अनावश्यक कागदपत्रे मागून शेतकऱ्यांची अडवणूक करू नये. असा प्रकार घडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी गुरुवारी सर्व बँकांना दिला.यंदा खरिपासाठी दीड हजार कोटींचे उद्दिष्ट आहे. त्यात जिल्हा सहकारी बँकेचे ४०५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, सुमारे २९० कोटींचे अर्थात ७२ टक्के कर्ज वितरित केले आहे. त्या तुलनेत इतर बँकांचे वितरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी आपले उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी गतीने कार्यवाही करावी. पीक वितरण गतीने होण्यासाठी बँक व्यवस्थापकांनी संबंधित गावांत ग्रामस्तरीय समितीशी समन्वय साधावा. कर्जासाठी विचारपूस येणाऱ्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण माहिती देऊन त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे. जादा कागदपत्रांची मागणी करुन नाहक त्रास देऊ नये, असेही निर्देश त्यांनी दिले. पीक कर्जासाठी आधार कार्ड, सात बारा उतारा, आठ अ, फेरफार, दोन फोटो, जमिनीच्या नकाशा संदर्भात तलाठी यांनी दिलेला हात नकाशा किंवा जमिनीच्या हद्दी नमूद करून दिल्यास तो ग्राह्य ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आवश्यक कागदपत्रांबाबत सूचनानो ड्यूज घेताना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्राऐवजी स्वयंघोषणापत्र घ्यावे. शेतीचा सातबारा, आठ-अ हे  डिजिटल स्वाक्षरीचे मान्य करावे. ग्रामस्तरीय कृती समिती यांनी शेतकऱ्यांचे अर्ज गोळा करून बँकेचे व्यवसाय प्रतिनिधी किंवा बँक प्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधूून कर्ज प्रकरणांचा निपटारा करावा. पीककर्ज नूतनीकरणासाठी शेतीचा सातबारा डिजिटल स्वाक्षरीचे मान्य करावे. शेतीचा आठ-अ नमूना पोर्टलवरून काढलेला स्वीकारण्यात यावा, अशी तंबी त्यांनी दिली. 

बँकनिहाय  खरीप कर्जाचे उद्दिष्टबँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडियाचे उद्दिष्ट प्रत्येकी ५० कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र २५० कोटी, कॅनरा बँक १६ कोटी, सेंट्रल बँक २१० कोटी, इंडियन बँक ३० कोटी, इंडियन ओव्हरसीज ८ कोटी, पंजाब नॅशनल १२ कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया ३१० कोटी, युको बँक ५ कोटी, युनियन बँक ५७ कोटी, तर खासगी बँकांत ॲक्सिस बँक १२ कोटी, एचडीएफसी व आयसीआयसीआय प्रत्येकी ३० कोटी, आयडीबीआय  ५ कोटी, रत्नाकर बँक १ कोटी, इंडसइंड  ५० लाख रुपये आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे उद्दिष्ट १८ कोटींचे आहेत.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जYashomati Thakurयशोमती ठाकूर