वरूड : तालुक्यातील घोराड येथील ग्रामपंचायत निवडणूक लढवून विजयी झालेल्या अतिक्रमिकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तेथील शेषराव घोराड यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे.
१९९२ मध्ये आलेल्या महापुरात घोराड येथील घरे वाहून गेल्याने शासनाने हे गाव पुनर्वसित करून घरे दिली. परंतु, काहींनी मूळ घराचा ताबा न सोडता दोन्ही घरे ताब्यात ठेवली, तर काही नवीन घरे विकून जुन्याच घरात वास्तव्य करीत आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार अतिक्रमणधारक सदस्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. घोराड येथेही असे अतिक्रमणधारक ग्रामपंचायत निवडणुकीत रिंगणात होते. त्यांच्यावर कारवाईसाठी ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांच्याकडून सन १९९२ ते २०२१ पर्यंत पुनर्वसित घरांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात माहिती घेऊन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी शेषराव कडू यांनी तहसीलदारांसह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.