धारणी-बिजुधावडी मार्गावर तहसीलदारांची कारवाई, गडगा मध्यम प्रकल्पावर जात होती रेती
धारणी : टिप्परद्वारे होत असलेल्या रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीवर तहसीलदारांनी गुरुवारी सकाळी तहसीलदारांच्या नेतृत्वातील पथकाने धारणी-बिजुधावडी मार्गावर मांडवा गावानजीक कारवाई केली. सहा वाहने ताब्यात घेण्यात आली. मध्य प्रदेशातून गडगा मध्यम प्रकल्पावर ही रेती आणली जात होती.
तालुक्यात पाच वर्षांपासून मंजूर असलेल्या गडगा मध्यम प्रकल्पाचे काम मागील एक वर्षापासून सुरू झाले. त्या प्रकल्पाकरिता मोठ्या प्रमाणात रेती लागत असल्याने कंत्राटदार मध्य प्रदेशातील हरदा येथून रेती आणत आहे. या रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीला महाराष्टात परवानगी नसल्यामुळे बुधवारी पहाटे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी कारवाई करून टिप्पर तहसील कार्यालयात जमा केले.
प्रकल्पाकरिता मध्य प्रदेशासह धारणीतील रेती तस्करसुद्धा चोरीच्या रेतीचा पुरवठा करत होते. त्याला महसूल प्रशासनाने कित्येक वेळा आळा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोरटे महसूल प्रशासनाला दाद देत नव्हते. अशातच ५ फेब्रुवारीला गौण खनिज वाहतुकीकरिता मध्य प्रदेश व महाराष्ट्र सरकारची परवानगी लागणार असल्याचे शासन परिपत्रक निघल्याने महसूल प्रशासनाने कारवाई सुरू केली. बुधवारी पहाटे ६ वाजता मध्य प्रदेशातील हरदा येथून गडगा मध्यम प्रकल्पावर ओव्हरलोड रेती वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार अतुल पाटोळे, नायब तहसील दार अजिनाथ गांजरे, मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचा०यांनी मांडवा गावाजवळ ही वाहने गाठली.
एमपी ०९ एमएच ६५२०, एमपी ४७ एच ०३७७, एमपी ०९ एचएच ५३९२, एमपी ०९ एचएच ८५२४, एमपी ०९ एचजे ६५२०, एमपी ०९ एचओ ३८० क्रमांकाची ही वाहने प्रशासनाने ताब्यात घेतली.
---------
महाखनिज पोर्टलवर नोंदणी आवश्यक
गौणखनिज वाहतुकीबाबत ५ फेब्रुवारीला निघालेल्या नवीन शासन परिपत्रकानुसार रेती वाहतुकीची महाखनिज पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. ती केली नसल्याने कारवाई करण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर चालकांचे बयान नोंदविण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया होत आहे.
-------------
जप्त करण्यात आलेल्या वाहनचालकाचे बयान नोंदविण्यात आले. रेती वाहतूकदाराला नोटीस देऊन त्यांचे बयान नोंदवून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- अतुल पाटोळे,
तहसीलदार
अतुल पाटोळे
-------------
मॅनेजरच्या इशा०याने पळाला चालक
टिप्पर पकडल्यानंतर तेथे प्रकल्पाचा व्यवस्थापक इनामदार व पांडे हे पोहोचले. त्यातील एका नवीन वाहनचालकाला तहसीलदारांदेखत त्यांनी इशारा करून वाहन सोडून पळण्यास सांगितले. त्याने तशी कृती केली. सकाळी ६ ते १० दरम्यान तहसील प्रशासनाला टिप्पर धारणीला आणायला आजूबाजूच्या शेतात चालकाचा शोध घ्यावा लागला. इतर चालकदेखील वाहने नेण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांची मदत घेऊन टिप्पर तहसील कार्यालयात आणण्यात आले.