संदीप मानकर ल्ल अमरावतीअमरावती : आरटीओच्या पथकाने व मोटर वाहन निरीक्षकाने गेल्या वर्षातील ८ महिन्यांत ६ हजार २४२ वाहनांवर कारवाई करून २ कोटी २८ लाख ४३ हजारांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१५ दरम्यान करण्यात आली. यामध्ये ६ हजार ५७८ वाहने आरटीओच्या अधिकाऱ्यांनी तपासले. त्यापैकी दोषी आढळलेल्या ६ हजार २४२ वाहन चालकांविरुद्ध केसेस करण्यात आल्या. २४२ वाहने प्रादेशिक परिवाहन कार्यालयात जमा करण्यात आले. यामध्ये १ कोटी ७२ लाख ३० हजार ८६६ ऐवढा दंड असून ४१ लाख ९४ हजार ७१७ रुपये त्यावाहनावरचा चालू कर व १४ लाख १७ हजार ६६६ रुपये थकीत कर असा २ कोटी २८ लाख ४३ हजार २४९ एवढा दंड ठोठावण्यात आला व वसूल करण्यात आला.या कारवाईमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने ट्रक, बसेस व इतर वाहनांचा समावेश आहे.ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर, उपप्रादेशिक पहिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्या मार्गदर्शनाखालील सह. प्रादेशिक परिवहन अधिकारी मार्तंड नेवासकर व मोटर वाहन निरीक्षक व सर्व सह. मोटर वाहन निरिक्षकांनी केली. गेल्या आठ महिन्यांत विविध प्रकारच्या कारवाईत २ कोटी २८ लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला नवीन वर्षात कारवाईचे मोठे उद्दिष्ट्य राहणार असल्याचेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले.
आठ महिन्यांत सहा हजार वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2016 12:54 AM