अमरावती : ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारीचा निपटारा हा गाव किंवा पंचायत समितीस्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु असे होत नसल्याचे या तक्रारीचा ओघ जिल्हा, विभागीय लोकशाही दिनात वाढत आहे. सदर प्राप्त तक्रारी जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्या जातात.त्यामुळे नागरीकांच्या तक्रारीचा गाव किंवा पंचायत समितीस्तरावर निकाली काढण्यासाठी २६ ऑक्टोंबर २०१८ पासृून जिल्हा परिषदेने मोठा गाजावाजा करून पंचायत समितीस्तरावर दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी लोकशाही दिन घेण्याचे जाहीर केले होते.परंतु तीन वर्षही पूर्ण होत नाही तोच हा लोकशाही दिन होते तरी कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे झेडपी प्रशासनाने केवळ सर्वसामान्यांना नावापुरताच दिलासा देण्यासाठी केवळ गाजावाजा करून धन्यता मानली की काय असा सुरू सर्व सामान्या नागरिकांन मधून व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी संबंधात ग्राम तथा पंचायत समितीवर वेळीच कार्यवाही होत नसल्याने या तक्रारी जिल्हा, विभागीय आणि शासनस्तरावर न्याय मिळविण्यासाठी नागरीक करतात. सदरच्या तक्रारी संबंधित विभागाकडून जिल्हा परिषदेस कार्यवाहीसाठी सादर केल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांच्या तक्रारीचा निपटारा हा त्वरीत करता यावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य्यकार्यकाऱ्यांनी प्रत्येक पंचायत समितीस्तरावर दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी सकाळी ११ ते दूपारी २ वाजेपर्यत लोकशाही दिन घेण्याचा निर्णय घेवून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश झेडपीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुखांनी काढले होते. लोकशाही दिनाची अंमलबजावणी २६ ऑक्टोंबर पासून केली. मात्र सुरूवातीला काही महिने हा उपक्रम राबविला गेला.आता मात्र या लोकशाही दिनाचा पंचायत समितीसह जिल्हा परिषदेलाही विसर पडला आहे.आता हा लोकशाही दिनच घेतला जात नसल्याने नागरिकांच्या तक्रारीचा ओघ वाढला आहे.याकडे मोठा गाजावाजा करून प्रत्येक पंचायत समितीनिहाय नेमलेले जिल्हा परिषदेतील संपर्क अधिकारीही लोकशाही दिन केव्हाचेच विसलेत असे चित्र दिसून येत आहे.अन प्रशासनाचे प्रमुखही याबाबत अनभिज्ञ आहेत.परिणामी पंचायत समितीस्तरावरील लोकशाही दिन हा केवळ नावापुरताच ठरल्याचे वास्तव आहे.
बॉक्स
पुन्हा सुरू होणार का लोकशाही दिन ?
जिल्हा परिषद प्रशासनाने गावपातळीवरील जनसामान्यांच्या समस्या तालुकास्तरावरच निकाली काढण्यासाठीगत काही वर्षापूर्वी सुरू केलेला पंचायत समितीचा लोकशाही दिन हा अल्पावधीतच बंद पडल्याने पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासन यावर लक्ष घालून लोकशाही दिन सुरू करणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.