आॅनलाईन लोकमतपरतवाडा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात सोमवारपासून मुक्कामी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वागत आदिवासींनी मोठ्या आनंदाने केले. त्यांच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्था प्रशासनाने केली असली तरी आदिवासींचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभत असल्याचा अनुभव ‘ड्रिम मेळघाट क्लिन मेळघाट’ अधिकारी-कर्मचाºयांना आला.मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील जवळपास ९९ गावांमध्ये दीड हजारांवर अधिकारी, कर्मचारी सोमवारपासून तीन दिवसांसाठी मुक्कामी गेले आहेत. या तीन दिवसांत ४५ ग्रामपंचायतींमधील सात हजारांवर शौचालयांची कामे त्यांना करवून घ्यायची आहेत. ३० डिसेंबर ते २४ जानेवारी या एकूण २५ दिवसांत १२ हजार शौचालये बांधण्यात आल्याचा इतिहास भारतात पहिल्यांदा घडणार आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ किरण कुलकर्णी यांनी क्लिन मेळघाट ड्रिम मेळघाटसह जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणाच कामाला लावली.शौचालयांच्या उद्दिष्टांसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी मेळघाटातील शाळा, दवाखाने, घरकुल कामे, ग्रामपंचायतींनासुद्धा भेटी देत तपासणी करीत आहे. आदिवासींसोबत संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व आणि त्यांच्या समस्या समजावून घेतल्या जात आहे. सर्व टीम जोमाने कामाला लागली आहे.- किरण कुलकर्णी, सीईओ, जि. प. अमरावती
आदिवासीही म्हणाले, ‘अतिथी देवो भव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:20 AM
आॅनलाईन लोकमतपरतवाडा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात सोमवारपासून मुक्कामी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वागत आदिवासींनी मोठ्या आनंदाने केले. त्यांच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्था प्रशासनाने केली असली तरी आदिवासींचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभत असल्याचा अनुभव ‘ड्रिम मेळघाट क्लिन मेळघाट’ अधिकारी-कर्मचाºयांना आला.मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील जवळपास ९९ गावांमध्ये दीड हजारांवर अधिकारी, कर्मचारी ...
ठळक मुद्देड्रीम, क्लीन मेळघाट : हातपंपाने पाणी काढत रमले अधिकारी