लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरातील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला तेथील कर्मचाऱ्याने गुरुवारी रात्री १० च्या सुमारास बेदम मारहाण केली. त्या मारहाणीचे वळ विद्यार्थ्याच्या शरीरभर उमटले आहेत. विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या कर्मचाºयास धारणी पोलिसांनी अटक केली आहे.आनंद सावलकर असे कर्मचाऱ्याचे, तर राजेंद्र सुकराम बेठेकर (१३) असे मारहाण झेलणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याचे नाव आहे. तक्रारीनुसार, तारुबांदा येथील राजेंद्र हा धारणी येथे जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत सहावीचा विद्यार्थी तेथीलच ख्रिश्चन मिशनरी वसतिगृहात वास्तव्यास आहे. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास राजेंद्र व त्याचा मित्र हे दोघे खेळत होते. अचानक आलेल्या आनंद सावलकर याने त्याला तेथे पडून असलेल्या झाडूने मारले. सोबतच्या दोन-तीन विद्यार्थ्यांनाही मारहाण केली. यानंतर आनंदने राजेंद्रला त्याच्या रूममध्ये नेऊन दरवाजा बंद केला आणि चामड्याच्या बेल्टने बेदम मारहाण केली. वाच्यता केल्यास आणखी मारेन, असेही धमकावले.आदिवासी विद्यार्थी शुक्रवारला सकाळी नियमित शाळेत आले. मात्र, मुख्याध्यापिका रामकु जावरकर व शिक्षकांना राजेंद्रच्या हालचालींवर संशय आला. त्याच्याकडून खाली बसणे वा उठणे होत नव्हते. त्यानंतर मुख्याध्यापिका व शिक्षकांनी त्याची चौकशी असता, रात्री घडलेला प्रकार त्याने कथन केला. शिक्षकांनी त्याच्या शरीराची पाहणी केली तेव्हा बेदम मारहाणीत उठलेले वळ दिसले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका रामकु जावरकर यांनी तात्काळ गटशिक्षणाधिकारी बंडू पटेल यांना माहिती दिली. त्यांनी दिया गावातील राजेंद्रचे मामा रामदास कासदेकर यांना बोलावून घेतले आणि धारणी पोलिसांत तक्रार देण्याचे सांगितले.विद्यार्थ्याला अमानुष मारहाणीची तक्रार नोंदवून घेतली. आरोपीला अटक केली आहे. मिशनरी वसतिगृह प्रशासनाचीही चौकशी होेईल.- विलास कुलकर्णीपोलीस निरीक्षक, धारणीआणखी किती विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, यासाठी वसतिगृह प्रशासनाची चौकशी करू न कारवाई करण्यात येईल.- बंडू पटेलगटशिक्षणाधिकारी, धारणी
आदिवासी विद्यार्थ्याला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:34 PM
शहरातील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला तेथील कर्मचाऱ्याने गुरुवारी रात्री १० च्या सुमारास बेदम मारहाण केली. त्या मारहाणीचे वळ विद्यार्थ्याच्या शरीरभर उमटले आहेत. विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या कर्मचाºयास धारणी पोलिसांनी अटक केली आहे.
ठळक मुद्देअंगभर उठले वळ : ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहातील प्रकार