रिद्धपूर : श्री क्षेत्र रिद्धपूर येथे पर्यटन तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभागतर्फे ८ कोटी ६० लाख रुपयांची कामे करण्यात आली. ती कामे निकृष्ट दर्जाची असल्याने चौकशीकरिता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत मोर्शीच्या बांधकाम अभियंत्यांना चौकशीचे आदेश दिले. व काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
विविध विकास कामांसह काँक्रिट नालीचे काम, बाजार सौंदऱ्यीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे हे रस्ते चार महिन्यांतच उखडले. विठ्ठल रुख्मिणी मंदिरासमोरील अपूर्ण काँक्रिट नालीचे काम पूर्ण करावे, नागोबा मंदिरसमोरील नालीचे बांधकाम करावे, या संपूर्ण कामाची चौकशी १० दिवसात करण्याबाबत तक्रार रिद्धपूर जी.प सर्कल प्रमुख मंगेश शेळके, रिद्धपूर पंचायत समिती सर्कलप्रमुख सचुन डवके तथा ग्रा.पं. सदस्य, महंत जायराज बाबा, प्रवीण जावरकर, गजानन पोहोकार, शाखाप्रमुख गोपाल सेवातकर, अजमत खा हुसेन खा, ग्रा.पं सदस्य सविता पोहोकार, पदमा डरगे, मनोज वानखडे, ज्ञानेश्वर श्रीराव, राजू ड रंगे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती येथे केली होती. उपोषणाचा इशारा दिला होता. या तक्रारीची दखल उपोषण करण्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोर्शी येथील अधिकाऱ्यांना कामाची पाहणी करण्याचे आदेश दिले. अभियंता प्रशांत सोळंके, तसेच उपअभियंता अभियंता प्रशांत सोळंके,तसेच उपअभियंता भारत दळवी यांनी पाहणी केली असून अपूर्ण काम पूर्ण करण्याचे आश्वासनदेखील दिल्याचे रिद्धपूर शिवसेना पंचायत समिती सर्कलप्रमुख तथा ग्रा.पं. सदस्य सचिन डवके यांनी सांगितले.