लोकमत न्यूज नेटवर्कपापळ : नांदगाव तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई भासत असून, सजीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पाण्याची भीषणता पाहता राज्यभर पाणी फौऊंडेशन वॉटर कप स्पर्धा राबविली जात आहे. याअंतर्गत पावसाचे पाणी साठविण्याचे नियोजन महाराष्ट्रदिनी पापळ येथे श्रमदानातून करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी कामाची सुरुवात केल्याने गावातील हजारोंच्या संख्येत नागरिकांनी या महाश्रमदानात हिरीरीने सहभाग नोंदविला.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथे पाणी फौऊंडेशन समिती, शेकडो कर्मचारी व नागरिकांच्या सहकार्याने १ मे या महाराष्ट्र दिनानिमित्त महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर श्रमदान तब्बल पाच तास चालले. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले, नांदगावचे तहसीलदार मनोज लोणारकर, कृषी अधिकारी अरुण गजभिये, पुरवठा निरीक्षक गजानन भेंडेकर, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, लघु सिंचन विभाग, भारतीय जैन संघटना, पोलीस कर्मचारी, रोटरी क्लब, महिला बचत गट आदी विविधनी हातात टोपले, फावडे घेऊन कामाला सुरुवात केली. त्यांची प्रेरणा घेत गावातील हजारो महिला-पुरुषांनी महाश्रमदानात सक्रिय सहभाग दर्शविला. यामुळे पावसाचे पाणी गावातून वाहून न जाता शेताच्या बांधावर जिरणार असून, पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे पुढील उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही, या उद्देशाने शासनामार्फत हा उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे १० हजारपापळ येथे महाराष्ट्र दिन व कामगारादिनी आयोजित महाश्रमदान कार्यक्रमात कामकाजासाठी येथील संदेश अनुप गांधी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच जैन संघटनेच्यावतीने कामकाजाकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली होती.काटपूर येथे महाश्रमदान दिंडीकाटपूर : येथे पाणी फौंडेशन स्पर्धेची दिंडी काढून महाराष्ट्रदिनी महाश्रमदानाला सुरुवात झाली. दुष्काळातून बाहेर पडण्याच्या उद्देशाने येथील दीडशे तरुणांनी अभेदय संघटना निर्माण केली. या स्पर्धेत १४२५ श्रमदानार्थींनी सहभागी होते. जि.प. उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षण सभापती, बांधकाम सभापती, तहसीलदार, वनविभाग, महसूल, पं.स. सदस्य आदींचे सहकार्य लाभले.धारणीत २८०० घनमीटर महाश्रमदानधारणी : तालुक्यातील कोठा येथे पाणी फौऊंडेशन अंतर्गत मंगळवारी महाश्रमदान करण्यात आले. यामध्ये १० मीटर लांबीचा नाल्याचे २८०० घनमीटर काम करण्यात आले. जलप्रवाह १० मीटर लांबीचे ४ जेसीबीने तयार करण्यात आले. दरम्यान, गणपत गायन यांनी पाझर तलाव दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी साहित्य उपलब्ध करून दिले. जि. प. सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांनी कोठा येथील उर्वरित कामासाठी डिझेलसह जेसीबी उपलब्ध करून देण्याची घोषणा श्रमदानाच्या समारोपात केली.श्रमदानासाठी आ. प्रभुदास भिलावेकर, पं.स.सदस्य रामविलास दहिकार, ग्रा.पं.पदाधिकारी तहसीलदार कोडे, कृषी अधिकारी वाशिंकर, बेठेकर, तालुका कृषी विभाग, वनविभाग, शिक्षक मंडळी, तलाठी, ग्रामसेवक, तांत्रिक सहायक, रोजगार सेवक, बोथरा, जांबू, कोठा, कोट, सोसोखेडा, नांदुरी, कारा येथील स्त्री, पुरुष श्रमिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. महाश्रमदानासाठी रामेश्वर धांडे, नागुलाल पतोरकर, गीता बेलपत्रे, आदींनी अथक प्रयत्न केले.
पाणीदार गावासाठी प्रशासन सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 11:48 PM
नांदगाव तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई भासत असून, सजीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पाण्याची भीषणता पाहता राज्यभर पाणी फौऊंडेशन वॉटर कप स्पर्धा राबविली जात आहे.
ठळक मुद्देदुष्काळाशी लढा : मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह विभागीय आयुक्तांचा महाश्रमदानात सहभाग