लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कृषी अभ्यासक्रमाच्या बहुप्रतीक्षित प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली आहे. या अंतर्गत कृषी शाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेला बुधवार, ९ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून, ऑनलाईन नोंदणी व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत मुदत राहणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील प्रवेश या प्रक्रियेमार्फत होणार आहे. दरम्यान नवीन वर्षात ११ जानेवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत. प्रवेशासंदर्भातील दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज व आवश्यक कागदपत्रे स्कॅन स्वरुपात संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. २ डिसेंबरला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर ऑनलाइन तक्रार करण्यासाठी २१ आणि २२ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश जानेवारीतसध्याच्या वेळापत्रकानुसार संकेतस्थळावर महाविद्यालयनिहाय उपलब्ध जागांची प्रसिद्धी १२ जानेवारीला केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयाकडे व्यक्तीश: प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्याची मुदत १४ व १५ जानेवारी असेल. महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर आणि सूचना फलकावर निवड यादी १६ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रवेशासाठी १७ व १८ जानेवारीची मुदत आहे. वर्ग सुरू होण्याची तारीख ११ जानेवारीला निश्चित केली आली.
राज्यातील कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची मुदत बुधवारपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 1:46 PM