लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मिड बे्रन अॅक्टिव्हेशन इन्स्टिट्यूटने दावे खरे असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर आम्ही ते सिद्ध करून दाखवू, अशा शब्दांत मिड बे्रन अक्टीव्हेशन संस्थेच्या शाखाप्रमुखाने अंनिसचे आव्हान स्वीकारले. अंनिसने मंगळवारी गाडगेनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीतून मिड बे्रन अॅक्टिव्हेशन इन्स्टिट्यूट ही शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप केला आहे.‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी राममोहन नगराजवळील गोपी कॉलनी स्थित मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन इन्स्टिट्यूटला भेट दिली. हे इन्स्टिट्यूट चालविणारे संदीप तायडे हे माझे भाऊ असल्याचे सांगून घरात उपस्थित महिलेने ‘लोकमत’च्या प्रश्नांना उत्तरे देताना वरील भूमिका विशद केली. याशिवाय संदीप तायडे यांच्याशी फोनवर संवाद साधला असता, त्यांनीही मिड बे्रन अॅक्टिव्हेशनसंबंधी केलेल्या दाव्याला दुजोरा दिला.फसवणूक झाल्याचे अंनिसला फोन कॉलअखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे बुधवारी काही पालकांनी फोन कॉल केले. आमची फसवणूक झाल्याचे पालकांचे म्हणणे होते. यानंतर मिड ब्रेन अॅक्टिव्हेशनचे दावे फसवेगिरी करणारे असल्यासंदर्भात अंनिसने पोलीस आयुक्तांना निवेदनसुद्धा सादर केले. मिड ब्रेन अॅक्टिव्हेशनची अमरावती शहरात चार केंद्रे असल्याची माहिती अंनिसचे कार्यकर्ते हरीश केदार व शेखर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.तिसरा डोळा उघडण्याचा फॉर्म्युला?माणसाच्या शरीरात सात चक्रे असताना, मिड ब्रेन अॅक्टिव्हेशनद्वारे सहाव्या क्रमांकाचे चक्र खुले केले जाते. ते खुले केल्यानंतर मुलांच्या मेंंदूची पॉवर जागृत होते. डोळे बंद करूनदेखील ते कोणतेही काम करू शकतात. डोळ्याला पट्टी बांधून गाडीही चालवू शकतात. सर्वांना मेंदू एकसारखा आहे. त्याचा १०० टक्के वापर कोणीही करू शकत नाही. आपण हा मेंदू केवळ अर्धा टक्का वापरात आणतो. अमरावतीत साधारण ८० मुलांना आम्ही प्रशिक्षित केले आहे. जे आम्ही सांगतो, ते तुमच्या मुलांमध्ये बघून घ्या, असा संवाद अंनिसकडे मिग बे्रन अॅक्टिव्हेशनच्या पदाधिकाऱ्यांनी साधला. तो संवाद अंनिसने रेकॉर्ड केला आहे.तिसरे चक्र जागे केल्यावर अनेक बाबी शक्यसदर महिलेनुसार, मानवी मेंदूतील सात चक्रांपैकी तिसरे चक्र जागे झाल्यावर सामान्यजनांना अशक्य वाटणाºया अनेक बाबी केल्या जाऊ शकतात. डोळ्याला पट्टी बांधून सायकल चालविणे, मैदानी खेळ खेळणे, आकडे, आकार, छायाचित्रे, करन्सी, वृत्तपत्र, पुस्तक, नोटवरील क्रमांक बघणे शक्य होते. याशिवाय डोळ्यांना पट्टी बांधलेली असताना गणित सोडविणे, चित्र साकार करणे आणि मोबाइल एसएमएस वाचणेही शक्य असल्याचा दावा या महिलेने केला.‘अंनिस’समोर करून दाखवूआमच्या मिड बे्रन अॅक्टिव्हेशन सेंटरचे कार्य नियमानुसारच आहे. डॉ. योगेश खुरसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माझा भाऊ संदीप तायडे हे केंद्र संचालित करतो. हल्ली आमच्याकडे परिसरातील मोजक्याच मुलांचे प्रवेश आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी आमच्याकडे मागणी केल्या, आम्ही सेंटरतर्फे ज्या बाबी जाहीर केल्या आहेत, त्या त्यांच्यापुढे प्रत्यक्ष सादर करून दाखवू, अशा शब्दांत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 1:09 AM
मिड बे्रन अॅक्टिव्हेशन इन्स्टिट्यूटने दावे खरे असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर आम्ही ते सिद्ध करून दाखवू, अशा शब्दांत मिड बे्रन अक्टीव्हेशन संस्थेच्या शाखाप्रमुखाने अंनिसचे आव्हान स्वीकारले. अंनिसने मंगळवारी गाडगेनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीतून मिड बे्रन अॅक्टिव्हेशन इन्स्टिट्यूट ही शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप केला आहे.
ठळक मुद्दे‘अंनिस’ जाणार काय? : ‘मिड बे्रन अॅक्टिवेशन’संबंधीचे दावे सिद्ध करू