शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

आमदारांची दत्तक शाळा, उपरसे टामटूम...!

By admin | Published: November 18, 2016 12:11 AM

खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांचा घसरलेला दर्जा उंचावण्यासाठी राज्यात सर्वदूर दत्तक शाळेचा अभिनव प्रयोग राबविला जात आहे.

शिक्षणाचा बट्याबोळ : रुख्मिणीनगर शाळेचा चार विद्यार्थ्यांवर डोलारा प्रदीप भाकरे  अमरावतीखासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांचा घसरलेला दर्जा उंचावण्यासाठी राज्यात सर्वदूर दत्तक शाळेचा अभिनव प्रयोग राबविला जात आहे. मात्र, या प्रयोगाला अमरावतीमध्ये काहींनी नख लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. स्थानिक आमदार सुनील देशमुख यांनी दत्तक घेतलेल्या रूख्मिणीनगर शाळा क्रमांक १९ ची अवस्थाही ‘उपरसे टामटूम अंदरकी राम जाने ’अशीच झाली आहे.महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांना आता गरीब आणि दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांच्या शाळा असे नवे नामाभिधान मिळाले आहे. राज्यात सर्वदूर खासगी शाळांची चलती असल्याने महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांची अधोगती झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन शिक्षणावर कोट्यवधी रूपयांचा खर्च करीत असले तरी याशाळांची दर्जात्मक वाढ खुंटली आहे. यावर उपाययोजना म्हणून राज्यशासनाने गतवर्षी दत्तक शाळांचा प्रयोेग राबविण्याची संकल्पना मांडली. प्रत्येक आमदाराने आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा दत्तक घेऊन त्याशाळांचे पालकत्व स्वीकारावे, त्याशाळांच्या दर्जात्मक आणि गुणात्मक वाढीकडे लक्ष पुरवावे, अशी ती संकल्पना होती.त्यानुसार आ. सुनील देशमुख यांनी महापालिकेची रूख्मिणीनगर शाळा क्रमांक १९ ची जबाबदारी स्वीकारली. आमदारांच्या माध्यमातून याशाळेचा कायापालट करण्याची जबाबदारी महापालिकेच्या शिक्षण विभागाची व तेथील मुख्याध्यापक, शिक्षकांची आहे. मात्र, प्रत्यक्षात याशाळेत बाह्य रंगरंगोटीशिवाय अन्य कुठलीही सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे संख्यात्मक, गुणात्मक आणि दर्जात्मक सुधारणेचा प्रश्नच उद्भवत नाही.पटावर ३४, उपस्थिती चौघांची पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग असलेल्या याशाळेकडे मोठे पटांगण आणि विस्तीर्ण असा परिसर आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने शिकवायचे तरी कुणाला, असा प्रश्न मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांना पडला आहे. येथे पहिलीत ७, दुसरीत ५, तिसरीत १०, तर चौथी आणि पाचवीत प्रत्येकी ६ अशी एकूण ३४ मुले आहेत. मात्र, प्रत्यक्षात गुरुवारी पहिली दुसरी आणि तिसरी मिळून केवळ ४ विद्यार्थी उपस्थित होते. केवळ अनुदान आणि शिक्षकांची नोकरी टिकविण्यासाठी शाळा सुरू असल्याचा केवळ देखावा केला जात असल्याचे शाळेच्या या स्थितीवरून दिसून आले.