शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

पीक कर्जवाटपावरून अडसुळ यांनी बँक अधिकाऱ्यांना खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:53 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : खरीप हंगाम सुरू झाला असून, पैशांची जुळवाजुळव न झाल्यामुळे शेतकरी पीक कर्जाकरिता बँकेत अर्ज करीत आहेत. बँकेचे अधिकारी अनावश्यक कागदपत्राकरिता शेतकºयांना त्रास देत असून नो-ड्युज दाखल्याची मनमानी फी बँक घेत असल्याची तक्रार युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी जिल्हाधिकारी व खा. आनंदराव अडसूळ यांच्याकडे केली ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : अनावश्यक कागदपत्रासह नो-ड्यूज दाखले फी घेऊ नये

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : खरीप हंगाम सुरू झाला असून, पैशांची जुळवाजुळव न झाल्यामुळे शेतकरी पीक कर्जाकरिता बँकेत अर्ज करीत आहेत. बँकेचे अधिकारी अनावश्यक कागदपत्राकरिता शेतकºयांना त्रास देत असून नो-ड्युज दाखल्याची मनमानी फी बँक घेत असल्याची तक्रार युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी जिल्हाधिकारी व खा. आनंदराव अडसूळ यांच्याकडे केली होती. त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावून खा. अडसूळ यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.पेरणीचा हंगाम सुरू झाला असताना शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. बी-बियाणेकरिता पैसे नसल्याने बँकेकडे कर्ज मिळण्याकरिता अर्ज करून वारंवार चकरा मारत आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असून शेतकºयांना नाहक कागदपत्र मागवून व बँकेच्या नो-ड्युज दाखल्याची मनमानी फी घेत असून वास्तविक नियमानुसार नो-ड्युज दाखल्यासाठी शेतकऱ्यांकडून कुठलीही फी घेऊ नये, असे सर्कुलर असल्यामुळे बँका फी घेत असल्याची तक्रार मारोटकर यांनी केली. यावर खा. अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बँकेच्या क्षेत्रीय प्रबंधकांना धारेवर धरून जिल्ह्यात एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास खबरदार बँक अधिकाऱ्यांना शिवसेना धडा शिकवेल, असा इशारा दिला. शेतकऱ्यांना बँकांनी सहकार्य न केल्यास बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा गंभीर इशारा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी बैठकीत दिला. यावेळी उपस्थित युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, तालुकाप्रमुख प्रवीण चौधरी, सरपंच गोकुळ राठोड, सुरेशराव राजगुरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.बँकेत अडचण आल्यास संपर्क साधाबँकेत कर्जासंबंधी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी अनावश्यक कागदपत्रे मागितल्यास, नो-ड्युजकरिता पैसे मागितल्यास आमच्याशी संपर्क साधावा, असे आव्हान प्रकाश मारोटकर यांनी केले आहे.